देवळाली प्रवराची कन्या डॉ.विशाखा शिंदे यांना न्याय मिळावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराची कन्या डॉ.विशाखा शिंदे यांना न्याय मिळावा

देवळाली प्रवरा(वेबटीम):- अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये शिकाऊ डॉक्टर विशाखा शिंदे हिची काही एक चूक नसताना त्यांच्यावर गुन्...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये शिकाऊ डॉक्टर विशाखा शिंदे हिची काही एक चूक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. डॉ. विशाखा यांच्यावर लावलेला जो आरोप आहे तो सरकारने मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे.        

 जिल्हाध्यक्ष पगारे यांनी म्हंटले की, ज्या दिवशी जिल्हा रूग्णालयात आग लागली त्यावेळी डॉ. विशाखा या विभागात ड्युटीवर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही नर्स आणि डॉ. विशाखा यांना दोषी ठरवल आहे.विशाखा ह्या विद्यार्थीनी  असतानाही त्यांना जळीतकांडा प्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे. 



    डॉ.विशाखा शिंदे ह्या जिल्हा रुग्णालयात शिकाऊ डॉ.म्हणून काम करत आहे. तरी पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वैद्यकीय अधिकारी म्हणून सांगण्यात आले आहे. त्यांचे निलंबन मागे घेतले परंतु न्यायालयीन कोठडी कायम आहे. ज्या जबाबदार व्यक्ती होत्या त्यांच्यावर कारवाई न करता शिकाऊ विद्यार्थिनीवर कारवाई केली आहे. 



डॉ.विशाखा यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी पगारे यांनी केली असून याबाबत आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे व राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांनीही याप्रकरणी लक्ष घालून डॉ.विशाखा यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे पगारे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत