राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड परिसरात रस्त्यावर दुकान थाटले जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
'आवाज जनतेचा' शी बोलताना गव्हाणे म्हणाले की, ताहाराबाद रोड हा अरुंद असून याच रोडवर भाजीपाला बाजार भरला जातो. तसेच दिवाळीची दुकाने याठिकाणी थाटली जाते.
याच मार्गावरून अवैध मुरुम वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. कणगर भागातुन मुरुम उतख्नन करणारे ढंपर व इतर वाहनांची ये-जा सुरू असते त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली जाते.
रस्त्यात भरणारा बाजार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू करणारे छोट मोठे व्यवसायिक व वाहनांची ये-जा यामुळे या रस्त्यावर वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत.
देवळाली प्रवरा नगरपालिकेने रस्त्यावर भरणारा भाजीपाला बाजार व दिवाळी पार्श्वभूमीवर विविध विक्री स्टोलधारक यांना मोकळ्या मैदानात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गव्हाणे यांनी केली आहे.
प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भोसले(आय.ए.एस) यांचे लक्ष वेधणार- गव्हाणे
ताहाराबद रोड वर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची महत्वाची भूमिका आहे. परंतु आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून मुख्याधिकारी निकत यांनी सत्ताधारी यांच्या सांगण्यावरुन या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. हा आमचा आख्यारीतला विषय नाही असे उत्तर देऊन कायम कानाडोळा केला गेला आहे. कोरोना काळात याच रस्त्यावर भरणारा बाजारकरूंच्या अंगावर अग्निशामक बंबाच्या सहायाने अंगावर पाणी उडवुन उठवून दिला आहे. त्यावेळी का?ताहाराबाद रस्ता आमचा आख्यारीतला विषय नही असे उत्तर ऐकायला आले नाही असा प्रश्न गव्हाणे यांनी उपस्थित करून याप्रश्नी आयपीएस जिल्हाधिकारी तथा प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी नेहा भोसले यांनी लक्ष घालुन तातडीनं या रस्त्याची पाहणी करून प्रश्न निकाली लावावा असे विजय गव्हाणे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत