राहुरी(श्रीकांत जाधव):- राहुरी तालुक्यातील श्री.क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज संस्थानच्या अध्यक्ष पदी राजेंद्र रावसाहे...
राहुरी(श्रीकांत जाधव):-
राहुरी तालुक्यातील श्री.क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज संस्थानच्या अध्यक्ष पदी राजेंद्र रावसाहेब साबळे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
आज शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ताहाराबाद येथे संस्थांचे सभागृहात विश्वस्त मंडळाची सभा घेण्यात आली. त्यामध्ये पुढील पाच वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी राजेंद्र रावसाहेब साबळे यांच्या नावाची सूचना आसाराम रंगनाथ ढुस यांनी मांडली. त्यास अनुमोदन बाबासाहेब सोपानराव वाळुंज यांनी दिले.
उपाध्यक्षपदासाठी अविनाश मुरलीधर कांबळे यांचे नावाची सूचना दत्तात्रय हरीभाऊ जगताप यांनी मांडली. त्यास सुभाष सुधाकर पाटील यांनी अनुमोदन दिले.
मॅनेजिंगट्रस्टी पदासाठी बाबासाहेब सोपानराव वाळुंज यांचे नावाची सूचना शिवाजी हरिभाऊ बंगाळ यांनी मांडली. त्यास मच्छिंद्र वामनराव कोहकडे यांनी अनुमोदन दिले. ऑनररी सेक्रेटरी पदासाठी ॲड.अशोक भाऊसाहेब किनकर यांच्या नावाची सूचना दत्तात्रय हरीभाऊ जगताप यांनी मांडली. त्यास अविनाश मुरलीधर कांबळे यांनी अनुमोदन दिले.
तसेच संस्थान संचलित न्यू इंग्लिश स्कूल ताहाराबाद हायस्कूलचे नामांतरण स्वर्गीय रावसाहेब कोंडाजी साबळे माध्यमिक विद्यालय असे करण्यात यावे.असे विश्वस्त मंडळाने एकमुखी निर्णय घेतला. त्यासाठी सूचना शिवाजी हरिभाऊ बंगाळ यांनी मांडली. त्यास शिवाजी बळवंतराव कोळसे यांनी अनुमोदन दिले. तसेच स्कूल कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मच्छिंद्र वामनराव कोहकडे यांनी दिला. हा राजीनामा मंजूर करण्यात येऊन स्कूल कमिटीचे अध्यक्ष पदासाठी सुरसिंगराव माधवराव पवार यांच्या नावाची सूचना शिवाजी हरिभाऊ बंगाळ यांनी मांडली. त्यास उपस्थित सर्व विश्वस्तांनी एक मुखाने ठराव संमत केला.
सभेचे कामकाज संपल्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्याचे सूत्रसंचालन बाबासाहेब वाळुंज यांनी केले स्वर्गीय रावसाहेब पाटील साबळे यांच्या कार्याचा योगदानाचा सर्वांनीच गौरव केला. नूतन पदाधिकारी यांचा सन्मान संस्थानच्यावतीने करण्यात आला.
राजेंद्र पाटील साबळे यांचा सन्मान ताहाराबाद। ग्रामपंचायतीचे सरपंच नारायणराव झावरे व दिंडी कमिटीच्या वतीने बापूसाहेब उंडेे, आबासाहेब हरीचंद्रे यांनी केला. संस्थापक विश्वस्त दादा पाटील इंगळे, शिवाजीराव कोळसे, अविनाश कांबळे ,रमेश नालकर कोहकडे सर, आसाराम पाटील ढुस ,डाॅ.हारदे यांनी शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले.
रामपूर ग्रामपंचायतीच्यावतीने राहुल साबळे,राजेंद्र खळदकर,बाबा थेटे, निवृत्ती खळदकर आदींनी सत्कार केला. यावेळी अशोक देशमुख, व्यंकटराव पवार, सुशीलाताई वराळे ,सुशीला ताई मुसमाडे ,सुगंधा ताई बानकर, लक्ष्मीबाई सोनवणे, राजेश वराळे, सचिव बाळासाहेब मुसमाडे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत