कोपरगावच्या खुले नाट्यगृह भूमीपूजनाचा मान दिला कलावंतांना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावच्या खुले नाट्यगृह भूमीपूजनाचा मान दिला कलावंतांना

  कोपरगाव(वेबटीम):- आज मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण ...

 कोपरगाव(वेबटीम):-


आज मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण कामाचे भूमिपूजन कोपरगाव शहरातील नाट्य व सिनेकलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.




यावेळी आ.आशुतोष काळे, चंद्रकांत शिंदे,सौ.पृथ्वीदेवी बिरारी,भरतजी मोरे,डॉ. तिरमखे,संतोष तांदळे, ऍड.मनोज कडू,नगरसेवक विरेन बोरावके,मेहमूद सय्यद,सौ.शिलेदार ताई,राजेंद्र वाकचौरे,मंदार पहाडे, सुनील गंगुले, आर्किटेक्ट रविकिरण डाके, राजेंद्र शिंदे, बागरेचा,शैलेश शिंदे,गणेश सपकाळ,केतन कुलकर्णी,विकास किर्लोस्कर, वीरकर सर,डॉ.किरण लद्दे, शिलेदार,राहुल देवरे,कुरेशी,आदी उपस्थित होते.प्रा.सौ.बिरारी,माधुरी ताई मुळे,डॉ.तिरमखे यांनी मार्गदर्शन केले.नटराज प्रतिमेचे पूजन आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




यावेळी बोलतांना आ.आशुतोषजी काळे यांनी बंदिस्त नाट्यगृह बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी बोलतांना, कोनशीला बनविताना सदरच्या कामाचे भूमिपूजन शहरातील कलाकारांच्या शुभहस्ते करण्यात आले असल्याचे उल्लेख करा असे आवर्जून सांगितले.असे करून शहरातील सर्व जुन्या-नव्या कलाकारांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही मत वहाडणे यांनी यावेळी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत