राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्यासाठी 1 डिसेंबर पासून ...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्यासाठी 1 डिसेंबर पासून जे आंदोलन पुकारले होते ते 15 दिवसासाठी स्थगित करण्यात येत आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यापैकी काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत काही मागण्या पुढील 15 दिवसात पूर्ण होतील .आरोग्य सेविका यांना आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती देणे ती दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली .तसेच आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदावर पुढील पंधरा दिवसात प्रोसेस होईल 10,20,30 चा काही आरोग्य कर्मचारी यांना लाभ भेटला नाही त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ती लवकरच पूर्ण होऊन लाभ मागील फरकासहित दिला जाईल.
तरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आज पत्र मिळाले असून दिनांक 1 डिसेंबर पासून साखळी उपोषण हे पुढील पंधरा दिवस पुढे ढकलण्यात येत आहे पुढील पंधरा दिवसांत नाही झाल्यास पुन्हा संघटनेला उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे लागेल असे संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोहर डिसले व सचिव श्री. किरण खेसम्हाळसकर यांनी सांगीतले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत