एम.के.आढाव विद्यालयाच्या शिक्षण समितीवर मिलिंद कोतकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एम.के.आढाव विद्यालयाच्या शिक्षण समितीवर मिलिंद कोतकर

कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील नगरपालिकेचे माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर सदस्य म्हणून मिलिंद कोतकर यांची...

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील नगरपालिकेचे माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर सदस्य म्हणून मिलिंद कोतकर यांची नुकतीच निवड झाली आहे.


शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर असलेल्या नगरपालिकेच्या माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर मिलिंद कोतकर यांची १ डिसेंबर,२०२१ पासून पुढील तीन वर्षे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तथाशालेय समितीचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.


 या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक बबलू वाणी, युवा नेते विक्रम सातभाई आदिंनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत