डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन पडला गुन्हेगारीत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन पडला गुन्हेगारीत

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे:-      वडील पुणे जिल्हा पोलिस दलात नोकरीला. मुलगा बीएचएमएसचे शिक्षण घेत होता. शिक्षण अधुरे सोडून पैशाच्या मोहा...

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे:-

 
  वडील पुणे जिल्हा पोलिस दलात नोकरीला. मुलगा बीएचएमएसचे शिक्षण घेत होता. शिक्षण अधुरे सोडून पैशाच्या मोहापायी तो गुन्हेगारीत पडला. गुन्हेगारांची टोळी करत एक-दोन नव्हे तर तब्बल ३२ गुन्हे त्याने केले. या काळात त्याची डॉक्टर असलेली पहिली बायको त्याच्या उद्योगाला कंटाळून सोडून गेली. मग त्याने दुसरी पटवली. तिला भेटण्यासाठी रांजणगाव येथे तो आला आणि डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाच्या जाळ्यात अडकला. मिटके यांनी त्याची गुन्हेगारी कुंडली खोदून काढली आणि त्याला जेरबंद केले. सागर भांड असे या खतरनाक गुन्हेगाराचे नाव आहे.

              अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक  गुन्ह्याकरिता सागरभांड हा कुख्यात आहे. भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. राहुरी येथील मयूर दिलीप देवकर यांनी  दाखल केलेल्या ३९५, ३९७, ३४१,५०६ आर्म ॲक्ट  ४/२५ हा गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य ५ सदस्यांना अटक करण्यात आली होती

                सागर भांड (टोळी प्रमुख), रवी   पोपट लोंढे, निलेश संजय शिंदे, गणेश रोहिदास माळी, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, रमेश संजय शिंदे अशी मोक्का कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

              पोलिस अधिक्षक  मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, बी.एन.सूर्यवंशी, पोलीस नाईक विकास साळवे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. 

             

पोलिसांनी पोलिसाच्या मुलावर मोक्का अंतर्गत कारवाई

 

               सागर भांडची टोळी कोणताही कामधंदा न करता संघटीतपणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. विशेष म्हणजे टोळीप्रमुख सागर भांडचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. तरीही सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत