राहुरी : उंबरे गावच्या शाळा व्यवस्थापन समिती निवडी रद्द करावी, यासाठी सुरुवातीपासून एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन तोंड घालणाऱ्या चपराश...
राहुरी :

उंबरे गावच्या शाळा व्यवस्थापन समिती निवडी रद्द करावी, यासाठी सुरुवातीपासून एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन तोंड घालणाऱ्या चपराशाला बीडीओनी ही समिती कायम ठेवण्याचा आदेश दिल्याने मोठी चपराक बसली, मात्र, तरीही हा चपराशी थांबला नाही, त्याने आपल्या नेत्यांकडे जाऊन 'मी पाया पडतो,पण शेजुळचा मोठ्या मतांनी पराभव करा, तरच माझी इज्जत राहील, असे साकडे घातले. त्याची तळमळ पाहून आणि आपल्यालाही चपराशीची गरज असल्याने या गावपातळीवरील आणि शाळेच्या निवडीत तालुक्याच्या नेत्यांनी सहभाग घेतला, दुर्दैवाने त्यांना मोठा पराभव तर दूरच मात्र एक मताने देखील पराभव करता आला नाही, या निवडीत समसमान मते मिळाल्याने चिट्टीवर बाळासाहेब पटारे अध्यक्ष झाले, या निवडणीनंतर पटारे यांचा शेजुळ यांनी एकमेकांचा सत्कार करून अभिनंदनही केले, मात्र इकडे चपरश्या निकालाकडे डोळे लावून बसला होता, परंतु ज्यावेळी त्याला समजले की शेजुळ आपण प्रयत्न करूनही पडला नाही, त्यावेळी त्याच्या डोळ्यात अक्षरश पाणी आले, मात्र त्यानंतरही चिठी कुणाची निघते, याकडे तो देव पाण्यात बुडवून होता, जर शेजुळ अध्यक्ष झाला तर आपली दुकानदारी बंद होईल, याची त्याला भीती होती, शिवाय शाळेत पुन्हा प्रवेशही मिळणार नव्हता. त्यामुळे तो एका घरात दडी धरून बसला होता. मात्र, ज्यावेळी अध्यक्ष निवडीची चिठी शेजुळ ऐवजी पटारे यांची निघाली, त्यावेळी त्याला आनंद गगनात मावेना. अक्षरशः त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आता आपली इज्जत तर वाचलीच शिवाय, पुन्हा आपली दुकानदारी सुरू होईल,या गोड गैरसमजातून त्याने पुन्हा खादी चढवून शाळा उघडण्यापूवीच सकाळी शाळेकडे चक्कर मारली. मात्र,शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष शेजुळ नसले तरी ते सदस्य असल्याने या चपराश्याला नाक खुपसत येणार नसल्याने याचे दुःख त्याला आहेच. चपराशीने याचा वृत्तत्रात बातमी देऊन आनंद उत्सव साजरा केला, पण दुसऱ्याच मिनिटाला पुन्हा ही निवड स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपचायत सदस्य यांना मतदानाचा अधिकार नसल्याने ही निवड रद्द होणार असल्याचे समजताच, त्याचा चेहरा पुन्हा पडला. चपराश्याने स्वतःची खुन्नस काढण्यासाठी वृत्तत्रात आकांडतांडव करून वस्तुनिष्ठ बातमी न छापता हे प्रकरण आणखी पेटावे, या उद्देशाने बातम्या छापली, मात्र, आता उपाध्यक्ष निवडीत केवळ एका मताने पराभूत झालेले , रवींद्र ढोकणे यांनी चपराशीमुले या निवडीला हरकत घेतली. आता ही निवड बेकायदेशीर की कायदेशीर, हे लवकर ठरणार आहे.याकडे गावची नसले तरी चपराशीचे जास्त लक्ष आहे, हे नक्की.क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत