चपराश्याची चपराशी बंद करा, तरच गाव सुधरेल : गणेश तोडमल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चपराश्याची चपराशी बंद करा, तरच गाव सुधरेल : गणेश तोडमल

राहुरी : वेबटीम >उंबरे गावची शाळा हे पवित्र ठिकाण आहे, येथे शाळेच्या निवडीत केवळ चुकीच्या गोष्टीला विरोध करतो, म्हणून त्या 'एका...

राहुरी : वेबटीम
>उंबरे गावची शाळा हे पवित्र ठिकाण आहे, येथे शाळेच्या निवडीत केवळ चुकीच्या गोष्टीला विरोध करतो, म्हणून त्या 'एका' माणसाला पाडण्यासाठी तालुक्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यानी रात्री धावपळ करणे, पैसे वाटणे हे गावाला तरी शोभणारे नाही,मात्र पळाले तर पळाले पण त्याला पाडता पण आले नाही, हे त्यांचे व त्यांना यासाठी पुढे करणाऱ्या चपराशाचे मोठे दुर्दैव आहे, हे करायची गरज नाही. उलट गावचे नेते म्हणून कामाच्या मानसामागे उभे राहण्याऐवजी नेहमीच चांगल्या कामात मिठाचा खडा टाकणाऱ्या 'वरतडे'च्या सांगण्यावरून त्याची पाठराखण करणे, ही गोष्ट दुःखदायक आहे, अशी खंत भाजपचे युवानेते गणेश तोडमल यांनी व्यक्त केली आहे. तोडमल, म्हणाले, उंबरे गाव हे संतांची भूमी आहे, येथील लोक गुण्यागोविंदाने नांदतात, मात्र हा वरतडे नामक विघनसंतोषी माणूस नेहमीच खोडसाळपणा करतो, माझ्यावर देखील मी ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्र केले होते, मात्र मी घाबरून जाणारा नाही, जे सत्य असेल त्या बाजूने मी उभा राहणार आहे, शाळा। व्यवस्थापन निवड झाली, त्यात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले, कुणाला समान मते मिळाली, कुणी एक मताने पराभूत झाले, मात्र निवडीनंतर त्यांनी मोठ्या मनाने झालं गेलं विसरून एकमेकांचे स्वागत केले, चहा, नास्था घेतला, पुढचे नियोजन केले, मात्र या चपराशाला ही शांतता नको होती, त्याने पुन्हा यांच्यामध्ये वाद कसे लागतील, हे कसं बंद पडेल यासाठी एकमेकांविरोधात भडकखाऊ लिखान केले, मात्र माझी गावकऱ्यांना विनंती आहे, याला साथ देऊन आपण चुकीच्या गोष्टीला साथ देत आहोत, हे लक्षात ठेवावे. मात्र, आमचा तरुणवर्ग चुकीच्या गोष्टीला साथ देणार नाही, यासाठी मी स्वतः कर्डीले साहेबांकडे जाऊन याने केलेले 'उदयोग' समोर मांडणार आहे, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत