साई संस्थान विश्वस्तपदाच्या माध्यमातून साई भक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- सुरेश वाबळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई संस्थान विश्वस्तपदाच्या माध्यमातून साई भक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- सुरेश वाबळे

राहुरी(श्रीकांत जाधव) शिर्डी संस्थांनच्या विश्वस्त पदाच्या माध्यमातून साई भक्तांच्या अडचणी, रुग्णालयांचे प्रश्न, कर्मचारी व ग्रामस्थांच्या स...

राहुरी(श्रीकांत जाधव)

शिर्डी संस्थांनच्या विश्वस्त पदाच्या माध्यमातून साई भक्तांच्या अडचणी, रुग्णालयांचे प्रश्न, कर्मचारी व ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिर्डी संस्थांनचे विश्वस्त  सुरेश वाबळे यांनी केले.


श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची महाराष्ट्र शासनाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी पात्रताधारक १२ सदस्यांची नावे जाहीर करून अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे व इतर विश्वस्त यांची निवड केली होती. परंतु राज्य शासनाकडून संपूर्ण विश्वस्त मंडळाची नेमणूक न केल्यामुळे नूतन अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा पदभार स्विकारण्यापासून मनाई करण्यात आली होती. त्या आदेशाच्या विरोधात  अध्यक्ष काळे व विश्वस्त यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कार्यभार करण्यापासून मज्जाव करण्याचा आदेश रद्द करून पदभार स्वीकारण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी नूतन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व विश्वस्त यांनी तदर्थ समितीचे अध्यक्ष, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला.


यानंतर'आवाज जनतेशी' बोलताना सुरेश वाबळे म्हणाले की, साई बाबांच्या कृपेने शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदाची पुन्हा संधी भेटली. विश्वास्तपदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही आरोग्य, शिक्षण तसेच साई भक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील असे सुरेश वाबळे म्हणाले.


 साई भक्तांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्या-त्यावेळी तातडीने उपाययोजना करण्यास अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ नक्कीच तत्परतेने निर्णय घेईल असे, सुरेश वाबळे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत