राहुरी (वेबटीम):- राहुरी नगरपालिका निवडणुकीत जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी जलतर...
राहुरी (वेबटीम):-
गुरूवारी राञी ना. प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामधे ना. तनपुरे यांनी सांगितले की, राहुरी शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सर्व सोई सुविधांनी परिपूर्ण असा जलतरण तलाव असावा. असा नगरपालिका २०१६ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात उल्लेख होता. परंतू पुर्वी आमच्या विचारांचे सरकार नव्हते. म्हणून निधी मिळत नव्हता. नंतर आमचे सरकार आल्यानंतर दुर्दैवाने कोरोना आला आणि दोन वर्षे असेच गेले. परंतु आता परीस्थिती जरा सुधारत आहे.
म्हणून नगरविकास विभागा मार्फत जलतरण तलावासाठी २ कोटी ६० लाख रूपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत स्टेशन रोड पाण्याच्या टाकीपासुन श्रीहरी मंगल कार्यालया पर्यंत रस्ता काँक्रीट मजबूतीकरण, रस्ता दुभाजक, सुशोभीकरण कामासाठी ४ कोटी रूपये वआणि नाका नं ५ वरील महात्मा फुले चौक सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडुन ३० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. येत्या दोन महिन्यात हि सर्व विकास कामे सुरू होणार असुन शहराच्या वैभवात भर पडणार आहे. प्रसंगी महाविकास आघाडी सरकार आणि माझ्या उर्वरीत कार्यकालात राहुरी शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आनुन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा विश्वास ना. तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत