आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे काही 'विद्यमान' राष्ट्रवादी प्रवेशासाठी मोठे आतुर झाले आहेत, यासाठी अनेकदा बैठ...
आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे काही 'विद्यमान' राष्ट्रवादी प्रवेशासाठी मोठे आतुर झाले आहेत, यासाठी अनेकदा बैठकाही झाल्या, काल-परवाही एक गुप्त बैठक झाली मात्र, त्यात, दादांनी प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असला तरी, नगरपालिकेचा मात्र 'शब्द' मिळाला नाही, त्यामुळे प्रवेश केल्यानंतर तरी खरंच 'दादा' पावतील का, नगरसेवक पदाची संधी मला देतील का ? अशी प्रार्थना ते करत असतील तर नवल वाटायला नको.
राहुरी नगर पालिका निवडणूक काही दिवसांवर आली आहे. सर्वच पक्ष येथे चाचपणी करत असले तरी खरी लाट ही राज्यमंत्री तनपुरेंचीच आहे, त्यामुळे ही हवा ओळखून अनेक जण राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी देव पाण्यात बुडवून आहेत, यात, भाजपचेदेखील काही इच्छुक असल्याचे आता लपून राहिलेले नाही. यातील,भाजप नगरसेवक ठाकूर यांनी पहिले धाडस दाखवत राष्ट्रवादीत शब्द घेऊन प्रवेश केला, आता आणखी काही लोकांनाही शब्द घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश हवा आहे, यासाठी मध्यतरी अनेक बैठका झाल्या, चर्चा झाली, मुहुर्तही ठरले पण दादा उमेदवारीचा शब्द देत नसल्याने 'ते' द्विधा मनस्थिती सापडले.
काल परवाही भाजपच्या काही लोकांनी पुन्हा दादांसंमवेत एक बैठक घेतल्याची चर्चा आहे, मात्र, या बैठकीत दादांनी राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची तयारी दर्शवली असली तरी उमेदवारी बाबत मात्र शब्द न देता आरक्षण सोडतीनंतर बघू, असे उत्तर दिल्याची चर्चा बाहेर आहे, त्यामुळे हे इच्छुक पुन्हा गोंधळले आहेत, आता भाजपकडून लढले तर अवघडआहे, आणि राष्ट्रवादीकडूनही शब्द मिळत नाही, त्यामुळें करायचे काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असून, राष्ट्रवादीत प्रवेश केला तर दादा नक्कीच पावतील असा काहिना विश्वास असल्याने लवकरच एक'-दोन नव्हे तर आणखी काहीं प्रवेश होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत