राहूरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात पहिली चोरीची घटना होवून २४ तासांचा कालावधी लोटत नसतानाच आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान प...
राहूरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात पहिली चोरीची घटना होवून २४ तासांचा कालावधी लोटत नसतानाच आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान पुन्हा दरोडा पडला.
सोनई - राहुरी रस्त्यावर ब्राम्हणी पासून काही अंतरावर संतोष चावरे व डॉ.चावरे या बंधूंच्या घरी दरोडा पडला.पाच ते सहा चोरटे असल्याची माहिती समजते. सुरुवातीला चोरटे भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीवर गेले होते.मात्र,त्या ठिकाणी चोरी करणे अशक्य वाटल्याने त्यांनी आपला मोर्चा चावरे यांच्या घराकडे वळविला. चोरट्यांनी चावरे यांच्या घरात घुसून हानमार सुरू केली.दरम्यान संतोष चावरे यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला
त्या भीतीपोटी पूर्ण कुटुंब धास्तावले. मुलाच्या आईकडून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेतल्या. उचकापाचक करून काही पैसे व दागिने चोरले.याशिवाय ब्राह्मणी परिसरात आशा सेविका म्हणून कार्य करणाऱ्या दिव्यांग आशा सेविका आशाताई चावरे यांच्या अंगावरील दागिने ओरबडून चोरट्यांनी पळविली.दरम्यान शेजारील तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र,ते एकत्रित येत ऊसात पळाले.भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीकडून शेतातून पायी चालत चावरे यांच्या घराकडे गेले. घराच्या मागच्या बाजूने टॉयलेट शेजारी असणारे गेट चे कुलूप तोडून आत शिरले. रात्री पाऊस झाला होता त्यामुळे चिखलाचे पाय आत घेवून पोत्याला पुसली. संतोष चावरे यांना धमकी देत तोंडावर कपडे घेऊन झोपा. असे बजावले लागलीच त्यांच्या मुलाला चाकू लावला.
मुलाच्या आईला कपाटाच्या चाव्या मागितल्या अंगावरील दागिने ओरबडली.गुरुवारी मध्यरात्री ब्राम्हणी चेडगाव रस्त्यावर रावसाहेब तरवडे यांच्या घरी झालेली चोरीची घटना ताजी असतानाच चोवीस तासाच्या आतच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे. सदर घटनांचा वेळीच योग्य तपास लावून चोरीच सत्र थांबून जनतेला दिलासा मिळावा आणि सर्वांना पुन्हा शांत पूर्वक झोप यावी एवढेच आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत