कोपरगाव शहरातील रस्ते दर्जेदार करा : निसार शेख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरातील रस्ते दर्जेदार करा : निसार शेख

कोपरगाव/प्रतिनिधी:- सध्या शहरात नवीन रस्त्यांच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. परंतु, ही कामे अतिशय नगरपालिका व नागरिकांनी गुणवत्ता तपास...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


सध्या शहरात नवीन रस्त्यांच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. परंतु, ही कामे अतिशय नगरपालिका व नागरिकांनी गुणवत्ता तपासून दर्जेदार करुन घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केले आहे.

याबाबत निसार शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, शहराच्या सर्वांगीण विकासात रस्त्यांची मोठी भूमिका असते. सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु कोपरगाव शहराचा जागरूक नागरिक म्हणून नगरपरिषद प्रशासन व संबंधितांनी रस्त्यांचे काम चालू असताना गुणवत्ता तपासून दर्जेदार रस्ते करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शहरवासियांना वर्षानुवर्षे नवीन रस्ते भेटत नाही, म्हणून रस्ते करताना त्यांचा दर्जा, गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. कारण, जुन्या रस्त्यावरच खडी टाकून डांबर मारून वरच्यावर काम सुरू आहे. खरेतर जुना रस्ता खोदून त्यात भर टाकून समतल करणे गरजेचे आहे. तरच हे रस्ते दीर्घकाळ टिकतील. याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत