राहुरी ः वेबटीम महाविकास आघाडी शासनाने समाजहिताला प्राधान्य दिले आहे. शासनाच्या योजना जनसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुरी तालुक्यातील श...
राहुरी ः वेबटीम
महाविकास आघाडी शासनाने समाजहिताला प्राधान्य दिले आहे. शासनाच्या योजना जनसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुरी तालुक्यातील शासकीय समितीमध्ये निवडीत झालेल्या पदाधिकार्यांनी लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असे आवाहन सेनेच जिल्हाध्यक्ष पै. रावसाहेब खेवरे यांनी केले.
राहुरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी सेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित यांना संधी मिळाल्याबद्दल पै. खेवरे यांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पै. खेवरे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यातील शासकीय समित्यांमध्ये सदस्य पद मिळालेल्या पदाधिकार्यांवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मोठी जबाबदारी आहे. सेनेचे युवक कार्यकर्ते पंडित यांनी नेहमीच समाजाभिमूख कार्य करताना अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत. महाविकास आघाडीचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनामध्ये सेना पक्षाने राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देताना चांगल्या कामांसाठी पुढाकार घेतलेला आहे. पंडित यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेमध्ये गरजूवंत लाभार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा पै. खेवरे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पंडित यांनी सांगितले की, पै. खेवरे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवूण करण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहू. मंत्री गडाख व राज्यमंत्री तनपुरे यांच्या विशेष सहकार्याने रहारी परिसरामध्ये चांगले काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी भरत धोत्रे, कैलास अडसूरे, श्रीरंग तारडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पंडित यांच्या निवडीबद्दल उंबरे ग्रामस्थांसह वांबोरी गटामधून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत