अहमदनगर(वेबटीम) नगर जिल्ह्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.यामध्ये लायसन शिवाय वाहन चालवि...
अहमदनगर(वेबटीम)
नगर जिल्ह्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.यामध्ये लायसन शिवाय वाहन चालविल्यास पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
तसेच ट्रिपल सीटला पूर्वी २०० रुपये तर आता १हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.विनासीट बेल्टला पूर्वी 200 तर आता 500,कर्णकर्कश हॉर्न वाजवल्यास पूर्वी 200 तर आता एक हजार व फोर व्हीलरच्या काचेला ब्लॅक फिल्म लावल्यास पूर्वी 200 तर नवीन नियमावलीत 500 असे इतरही उल्लंघनाच्या प्रकारामध्ये नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे.त्याची अंमलबजावणी चालू झाल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांनी प्रेस नोट द्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत