राहुरी : चपराशीचे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी 11 भागातील 'नाजूक' विषय दुसऱ्या टप्यात वाचकांसाठी राखून ठेवली आहेत. त्यापूर्वी वाचका...
राहुरी : चपराशीचे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी 11 भागातील 'नाजूक' विषय दुसऱ्या टप्यात वाचकांसाठी राखून ठेवली आहेत. त्यापूर्वी वाचकाकडून येणाऱ्या किस्सावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. चपराशीने माजी लोकप्रतिनिधीच्या तसेच गटातील नेत्यांच्या नावाचा कुठं कुठं वापर करून माया कमवली, काही गावच्या काही पदाधिकाऱ्यांना डान्सबारमध्ये नेऊन त्यांचेच फोटो काढत यांना कसे ब्लॅकमेल केलं, पोलिसात गेलेले गुन्हे मिटविण्यासाठी त्याने कुणाकुणाची नावे वापरून कशी कशी दलाली काढली, याबाबत लोक आवर्जून सांगत आहेत. काल एकाने सांगितलेला किस्सा असा की, काही महिन्यापूर्वी वांबोरी गटातील एका विद्येच्या मंदिरात महिला कर्मचारीला आपल्या कामासाठी एक शिफारस हवी होती, झेडपीत वांबोरीचे वजन असल्याचे चपराशीला माहिती होते, शिवाय त्यामुळे त्याने तत्काळ एक शिफारस पत्र तयार केले आणि त्या महिला व्यक्तीसमोर खाली सहिच्या ठिकाणी ' शिफारस देणाऱ्या त्या' व्यक्तीच्या नावाने खोटी सही करत, जा हे पत्र घेऊन, तुमचं काम झाले समजा, अशी फुशारकी मारली, मात्र, याबाबत शिफारस देणाऱ्या व्यक्तीची सही का घेतली नाही, अशी शंका उपस्थित करताच, झेडपीत अधिकारी सही चेक करत नाहीत, नावावर काम होते, वांबोरी आणि उंबरेचा पिए म्हणून मीच काम पाहतो, काळजी करू नका. माझ्या शब्दला तिथं किंमत आहे, अशी चपराशीने समज काढली. त्यामुळे ती महिला शिफारस घेऊन झेडपीत पोहचली देखील, मात्र नको ते झालं आणि ती शिफारस पाहून एका चाणाक्ष अधिकार्याने ती सही खोटी असल्याचे ओळखून, ज्यांनी ही शिफारस पाठवली त्यांना अध्यक्षांशी बोलायला सांगा, असे उत्तर देऊन ती शिफारस कचऱ्यात टाकून दिली, आता खरच त्या महिलेलाही चपराशीची खरी किंमत समजल्याने तिने याचा त्याला जाब विचारला, त्यामुळे त्यानेही पुन्हा त्या महिला कर्मचारीला तोंड दाखवले नसल्याचेही एकाने सांगितले.
दोन दिवसांपासून अनेक कॉल आले, की या ठगाला चपराशी नाव कुणी व नेमकं का दिल, तर, मित्रानो, याच झालं असं की, 'याचं त्याला आणि त्याचं याला' अशा काड्या करून उंबरेच्या त्या बहादाराने आपली दुकानदारी सुरू केली. एकमेकांविषयी मनात विष पेरायचं, ही कला त्याने यासाठी वापरली,यात अनेक नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाले, अंतर्गत वाद उफाळून आले, मात्र, एक दिवस कारखान्यातील बदलानंतर वांबोरी ऐवजी उंबरेचे वाढलेले महत्व हेरून, त्याने मोठ्या खुबीने विश्वास जिंकण्यासाठी 'वांबोरी'ची एक खास राजकीय खबर त्याने उंबरेच्या ' खळ्यात' पोहचवली. ही खबर ऐकून हशा झाला, मात्र, त्याचवेळी एका ज्येष्ठ पुढाऱ्याने त्याचे हसून दात पाडताना, अरे इतक्या दिवस जीथं पोट भरलं, त्यांचे येथे येऊन सांगतो, आणि यापूर्वी इथं काही घडलं की तिथं जाऊन सांगायचा, हा चपराशीपणा बंद कर, असे कान टोचवले आणि तेंव्हापासून ' चपराशी' नावानेच त्याची ओळख झाली. गावातील अनेकजण आजही त्यास चपराशी म्हणूनच संबोधतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत