राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणवेश वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणवेश वाटप

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यम...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गणवेश वाटप करण्यात आले.



माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असतानाच राहुरी फॅक्टरी येथील व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत पँडीत यांच्या पुढाकारातून नूतन माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.



 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा पेट्रोलियम संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त पवार होते. तर यावेळी व्यासपीठावर सुनील विश्वासराव, विक्रांत पंडित, शरद वाळके, माजी नगरसेवक प्रदीप गरड, ऋषिकेश संसारे, शरीफभाई शेख, पारस चोरडिया, भास्कर कोळसे,समीर शेख, शरद साळवे, दत्तात्रय दरंदले, सुनील गोसावी, मुख्याध्यापिका सौ.साळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.डी. तनपुरे, मकरंद गोलांडे, बी.जी.तनपुरे, भारत पवार, योगेश दिघे, ममता गरड, छाया बडदे सूत्रसंचालन कविता जेजुरकर यांनी  तर आभार मकरंद गोलांडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत