राहुरी फॅक्टरी येथील शाळा व महाविद्यालय परिसरातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील शाळा व महाविद्यालय परिसरातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल  व ज्युनियर कॉलेज परिसरात टार्गेट मुलांचा वाढता त्रास रोखण्यासाठी तातड...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल  व ज्युनियर कॉलेज परिसरात टार्गेट मुलांचा वाढता त्रास रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवून त्याचा बंदोबस्त करू असे प्रतिपादन राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी केले.


 राहुरी फॅक्टरी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज परिसरात दररोज कॉलेज भरताना व सुटताना महाविद्यालयीन मुलींना छेडछाडीचे  प्रकार रोडरोमिओंकडून सातत्याने होत असताना यातून हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. रोडरोमिओ तथा टार्गेट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एन.आर.जाधव सर यांनी पत्रव्यवहार करून याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. भाऊसाहेब पगारे यांनी पोलीस निरीक्षक इंगळे यांना याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आज पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी बोलताना श्री.इंगळे म्हणाले की, राहुरी फॅक्टरी येथील शाळा, महाविद्यालय परिसरात जर विनाकारण टार्गेट मुले फिरून जर त्रास देत असतील तर त्यांचा उद्यापासून पोलीस प्रशासन बंदोबस्त करणार आहे. महाविद्यालयीन मुलींनी न घाबरता प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांकडे तक्रार करावी. त्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू असे पोलीस निरीक्षक इंगळे म्हणाले. यावेळी भाऊसाहेब पगारे, पर्यवेक्षिका साळवे मॅडम, गणेश लांडगे,करपे सर, विशाल तागड, भाऊसाहेब जगधने , विजय नरवडे आदिंसह शिक्षक वृंद उपस्थित होते.


पोलिसांच्या हिसक्याची गरज-पगारे

राहुरी फॅक्टरी येथील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण भरधाव वेगाने मोटरसायकल चालविणारे, शाळेचा गणवेश व ओळखपत्र न बाळगता फिरणारे, टवाळखोरी करणारे, मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांना राहुरी पोलिसांनी हिसका दाखवावा अशी मागणी भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत