कोपरगाव/प्रतिनिधी:- घारी गावाच्या विकासासाठी वेळप्रसंगी अपक्ष उमेदवार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते किसन पवार यांनी दिली. सुमारे ...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
घारी गावाच्या विकासासाठी वेळप्रसंगी अपक्ष उमेदवार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते किसन पवार यांनी दिली.
सुमारे अठराशे लोकसंख्या असलेले कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतची ९ सदस्य संख्या आहे. दरम्यान, एका सदस्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आजपर्यंत गेल्या ३० वर्षांपासून कोल्हे गटाच्या पाठिशी राहून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कामाच्या माध्यमातून काम केले असून, त्या कामाची पावती म्हणून कोल्हे गटाची उमेदवारी आपल्याला मिळणार असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते किसन पवार यांनी व्यक्त करून यदाकदाचित उमेदवारी मिळाली नाही तर गावच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्नांसाठी आपण वेळप्रसंगी अपक्ष उमेदवारी करणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते किसन पवार यांनी दिली आहे.
गावातील रस्ते, पाणी, शौचालय, गटारी, वृक्षारोपण, शेत पाणंद रस्ते, दलितवस्ती विकास, शैक्षणिक सुविधा, शाळेची इमारत अद्यावत करणे, वाचनालय, व्यायामशाळा आदी प्रश्न सोडवि ण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचेही नमूद केले आहे. याचबरोबर गावात राजपूत मराठा समाज मोठा असून या समाजाचे राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान राहिले आहे .
मात्र त्या प्रमाणात संधी मिळाली नाही. ज्या प्रमाणात कामे व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात ती झाली नाहीत. ही कामे तडीस लावण्यासाठी आपली उमेदवारी असून, शासकीय योजना व प्रशासकीय कामांचा अनुभव आहे त्याचा उपयोग गाव विकासासाठी करणार असल्याचेही किसन पवार यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत