नेवासा(बाळासाहेब नवगिरे):- भूमि अभिलेख अधिक्षक कार्यालयातील सर्वेअर व भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाबळे हे सेवानिवृत्त ...
नेवासा(बाळासाहेब नवगिरे):-
भूमि अभिलेख अधिक्षक कार्यालयातील सर्वेअर व भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाबळे हे सेवानिवृत्त झाले सेवा निवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान जिल्हा भूमि अभिलेख अहमदनगर सुनील इंदलकर यांनी त्यांचा यथोचित सन्मान कार्यालय केला.वाबळे यांनी १५ वर्षे भारतीय नौदलात लघू अधिकारी म्हणून सेवा केली १९८६मध्ये श्रीलंकेत गेलेल्या शांती सेनेत सहभागी होते.नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भूमि अभिलेख विभागात सेवा केली. ते नाशिक येथेही कार्यरत होते नगर तालुका कार्यालयात सेवा बजावल्यानंतर दीर्घकाळ ते अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे आपली सेवा बजावली संयमीपणा व प्रामाणिक पणे काम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कोणाची अडवणूक केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. भूमी अभिलेख कार्यालयाच्या समस्या निराकरणातही ते अग्रभागी असत जमीन एकत्रीकरण, व जमीन मोजणी यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे सेवानिवृत्त निमित्ताने अधीक्षक इंदलकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला इंदलकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी भूमी अधीक्षक अधीक्षक अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक श्रीमती पतंगे, सनी जाधव, इतर गणेश वाघ, बारगजे, गायसमुद्रे ,श्रीमती पुंड आदींसह सौभाग्यवती सुनिता वाबळे, मुलं अजय, विजय सह सुना नीता, अश्विनी वाबळे उपस्थित होत्या.
प्रतिक्रिया- भूमि अभिलेख हा विभाग महसूल मधील आत्मा असून इंग्रजांच्या काळात हि हा विभाग विशेष आग्रभागी होता. जमिनी एकत्रिकरण तसेच जमिनीचे सव्हॅ नंबरचे गट नं होताना कापडी नकाशावर हस्त दोषाने झालेल्या चूका दुरुस्ती तक्रारी अर्ज तसेच आदी कामा साठी जिल्हा भरातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते नेहमी तप्तर सेवा देत.त्यांचा कालखंडात अनेक शेतकऱ्यांना न्याय दिला शेतकरी त्यांचे त्रणी आहे त्यांचा या कामामुळे भूमि अभिलेख विभागाची मान उंचावली तसेच शेतकऱ्यांचा भूमि अभिलेख विभागातील समस्या सोडण्यासाठी लवकरच संघटनेची स्थापना करुन भाऊसाहेब वाबळे यांनी मार्गदर्शन करावे - बाळासाहेब नवगिरे पाटील
भूमी अभिलेख विभागात काम करतांना अतिशय आनंदाने काम केले. जिल्ह्यातील काना कोपऱ्यांतुन आलेल्या शेतकऱ्यांचा अडचणी समस्या सोडून नवं चैतन्य मिळतं असे तसेच सेवा निवृत्तीनंतरही जमिन एकत्रिकरण प्रकरण, तसेच दुरुस्ती बाबत निःशुल्क हे काम सुरुच ठेवणार आसल्याचे भाऊसाहेब वाबळे यांनी सांगितले.
भूमि अभिलेख येथे प्रमाणिक सेवा देवून निश्चितच महसूल प्रशासनाची मान भाऊसाहेब वाबळे यांनी उंचावली असून नेहमीच त्यांचा अनुभवाचा फायदा होईल.तसेच त्यांनी जमिन एकत्रिकरण प्रकरण तसेच कापडी नकाशा दुरुस्ती साठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना लाभ होईल.पुढील निरोगी तसेच समाजसेवी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा यावेळी भूमि अभिलेख अधिक्षक सुनिल इंदलकर यांनी दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत