राहुरी : फोनवर बोलणाऱ्या बायकोला कुणाशी बोलते, हे विचारल्याचा तिला राग आल्याने तिने लाकडी बॅटने नवऱ्याला ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात घ...
या घटनेची माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका गावात जोडपे राहते. यातील दोघे मजुरी करतात. दरम्यान, आपली बायको ही दि. 02/12/2021 रोजी 07/15 वा.चे सुमारास राहते घरी कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. यावेळी नवऱ्याने बायकोला कुणाशी बोलत होती, असे विचारले, त्यावेळी तिला याचा राग आल्याने तिने लाकडी बॅटने नवऱ्याला मारहाण केली, तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून, राहुरी पोलिसात त्या नवऱ्याने आपल्याला बायकोने मारहाण केल्याचा फिर्याद दिली असून, त्या बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी : फोनवर बोलणाऱ्या बायकोला कुणाशी बोलते, हे विचारल्याचा तिला राग आल्याने तिने लाकडी बॅटने नवऱ्याला ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत