राहुरी(वेबटीम):- कोरोना महामारीचा वाढता संसर्ग व ३१ डिसेंबर पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांच्यावतीने राहुरी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात य...
राहुरी(वेबटीम):-
कोरोना महामारीचा वाढता संसर्ग व ३१ डिसेंबर पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांच्यावतीने राहुरी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येऊन वाहनांची तपासणी करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक पावले उचलली असून ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष आनंद साजरा करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान आज रात्री राहुरी शहरात पोलिसांनी ठीक ठिकाणी नाकेबंदी करण्यात येऊन वाहनांची तपासणी करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधूकर शिंदे , पोलीस हेडकॉन्स्टेबल साईनाथ टेमकर ,विकास साळवे, मनोज रजपूत,दिगंबर सोनटक्के, भाऊसाहेब शिरसाठ, रंगनाथ ताके, अमित राठोड , होमगार्ड पथक धनंजय वाघमारे, सौरभ जाधव, रमेश मकासरे,भागवत तनपुरे,सोफियान पठाण तसेच पोलिस मित्र आलम शेख यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत