राहूरी/वेबटीम:; महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील कोंढवड येथील महिलांना संघटित करून महिला स्वयंसहाय्यता समूहांची...
राहूरी/वेबटीम:;
या महिला सभेच्या अध्यक्षस्थानी कोंढवड ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण गायकवाड, तालुका समन्वयक पगारे मॅडम, सुनिता दातीर, तांबे, ग्रामसेवक शिवाजी पल्हारे, क्रांतीसेनेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, दशरथ म्हसे, सुनिल हिवाळे, संभाजी म्हसे, चंद्रकांत म्हसे, नरेंद्र म्हसे, महेश म्हसे, वेणुनाथ हिवाळे, देविदास म्हसे, उमाजी नवले आदींची प्रमुख उपस्थित होती.
या महिला ग्रामसभेस तालुका अभियान व्यवस्थापक गायकवाड यांनी मार्गदर्शन करुन स्वयंसहाय्यता समूह चालवण्यासाठी दशसुत्रीची माहिती दिली. तसेच महिलांना बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळेस कोंढवड गावातील १७ स्वयंसहाय्यता समूहांची स्थापना करण्यात आली. निवडणूक प्रकियेद्वारे या समुहांच्या समुदाय संसाधन व्यक्ती (आय.सी.आर.पी) पदी स्वराज्य जननी समुहाच्या अध्यक्षा राधिका मधुकर म्हसे यांची निवड झाली. या निवडीचे महाराष्ट्र राज्याच्या माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील, नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हसे, उपसरपंच इंद्रभान म्हसे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण म्हसे, कोंढवड सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ म्हसे, गोरक्षनाथ म्हसे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या सभेस रोहिनी म्हसे, मंगल म्हसे, भारती म्हसे, मंदा पेरणे, सुमन हिवाळे, सरिता म्हसे, रेखा म्हसे, सविता म्हसे, वैशाली म्हसे, प्रतिभा औटी, मंजुश्री म्हसे, शितल औटी, मंगल सुनिल म्हसे, जया म्हसे, भारती पवार, अश्विनी म्हसे, मंगल दशरथ म्हसे, सुरेखा म्हसे, शांताबाई म्हसे, जिजाबाई म्हसे, सुप्रिया म्हसे, सरिता पवार, नंदिनी म्हसे, सोनाली म्हसे, उमा म्हसे, मीरा माळवदे, रुपाली म्हसे, विमल म्हसे, वैशाली माळवदे, लता म्हसे, पिसाळ मॅडम, वंदना म्हसे, स्वाती औटी, अरुणाताई म्हसे, सुनिता म्हसे, आनिता पाले, ज्योती म्हसे, अलका म्हसे, अर्चना म्हसे, निता म्हसे, आशा म्हसे, सुवर्णा म्हसे, मिना औटी आदींसह महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत