कोपरगांव/वेबटीम:- संजीवनी अकॅडमीच्या बेसबाॅल संघाने गुडगाव, हरियाणा येथे संपन्न झालेल्या युएसए प्रायोजीत मेजर लिग बेसबाॅल (एमएलबी) इंडिया कप...
कोपरगांव/वेबटीम:-
संजीवनी अकॅडमीच्या बेसबाॅल संघाने गुडगाव, हरियाणा येथे संपन्न झालेल्या युएसए प्रायोजीत मेजर लिग बेसबाॅल (एमएलबी) इंडिया कप २०२१ मध्ये सहभाग नोंदवुन कांस्य पदकाची कमाई करून संजीवनी अकॅडमीने पुन्हा एकदा देशाच्या क्रीडा क्षेत्रात आपले नाव अधोरेखित केले आहे, अशी माहिती स्कूलच्या संचालिका सौ मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात सौ कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की देशातील विविध शाळांमधिल ९ ते ११ वयोगटातील बेसबाॅल खेळाडूंनी पुर्वी कोठे व कसे यश मिळविले, याची भारतातील एमएलबी इंडिया कप २०२१ कार्यालयाने छाननी केली. त्यात देशातील 12 संघांची निवड करण्यात आली. यात संजीवनी अकॅडमीच्या बेसबाॅल संघाची निवड झाली, ही प्रथमदर्शनी संजीवनी अकॅडमीने मोठी उपलब्धी मिळविली. निवडलेल्या १२ संघात अटीतटीचे सामने झाले. त्यात संजीवनी अकॅडमीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई करून स्कूलच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. संजीवनी अकॅडमीच्या संघात ९ ते ११ वर्षे वयोगटातील स्वरीत मनोज गोलेचा, कृष्णा निलेश बागुल, सर्वेश तुषार शेळके, आर्यन नितीन नारखेडे, जय तरूण भुसारी, श्रेयश अमोल सानप, शाहू प्रसादकुमार निकम, नील विकास काटे, वेदांत परेश आढाव, रघुनाथ विनोद लोंगाणी, निर्भय रूपेश पारख व देवेश कारभारी मालकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी व असिस्टंट कोच तुषार एरंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सामने झाल्यावर या सर्व खेळाडूुना एमएलबी आशिया पॅसिफिक क्षेत्राचे बेसबाॅल डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर रीक डे यांचे हस्ते कांस्य पदक प्रदाण करण्यात आले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी विरूपक्ष रेड्डी, पिन्सिपाल शैला झुंजारराव, अजित सदावर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय पातळीवरील यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, संचालिका सौ मनाली कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत