कोपरगाव(वेबटीम) रक्तदान हे श्रेष्ठ दान असे समजून गरजवंताला रक्त देण्याची जिद्द मनाशी बाळगून भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदम...
कोपरगाव(वेबटीम)
रक्तदान हे श्रेष्ठ दान असे समजून गरजवंताला रक्त देण्याची जिद्द मनाशी बाळगून भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे यांनी तब्बल ३६ वेळा रक्तदान केले आहे.
दिव्यांग असतांना देखील स्वतःच्या शारिरिक कमतरतेवर मात करून नवा आदर्श काळे यांनी समाजासमोर ठेवला आहे.भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी दिव्यांग बांधवांना मदत कार्याचा ओघ सुरू केला त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हा दिव्यांगांना समाजात मान सन्मान मिळू लागला असे सांगताना काळे हे भावुक झाले.मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सामाजिक भावनेतून प्रत्येक काम करणासाठी नेहमी साथ व प्रेरणा दिली आहे.त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला मदतीला धावून जाण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही असेही काळे म्हणाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत