अहमदनगर (वेबटीम) स्वर्गीय खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त उदया (दि.30) डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊ...
स्वर्गीय खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त उदया (दि.30) डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलम सभागृह येथे सकाळी 11.00 वा, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने केंद्रशासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मोफत सहाय्यक साधने वाटप जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,समाज कल्याण अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सन 2018 पासून सुरु करण्यात आलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित अपंग पुनर्वसन केंद्रा मार्फत गरीब व गरजू दिव्यांग व्यक्तींना उत्कृष्ट सुविधा पुरविल्या जात आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून 121 पात्र दिव्यांगाना तीन चाकी सायकल, व्हीलचिअर्स, कुबडी, ट्रायपॉड्स व वॉकर्स इत्यादी प्रकारचे सहाय्यक साधने विनामूल्य वितरीत करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर विद्यापीठा व्दारे प्रदान करण्यात आलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संस्थेतील शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, संस्थेतील विविध विषयांत उत्कुष्ट संशोधन करणारे शिक्षक, कोविड आजारा वरील विक्रमी लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये जिल्ह्यातील पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रिक्रिया यशस्वी करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत