देवळाली प्रवरात टवाळखोर रायडर्सचा उच्छाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात टवाळखोर रायडर्सचा उच्छाद

देवळाली प्रवरा(वेबटीम):-     राहुरी फॅक्टरी बरोबरच देवळाली प्रवरा शहरात  टवाळखोर  रायडर्स  शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय या समोरुन दुचा...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

 


 राहुरी फॅक्टरी बरोबरच देवळाली प्रवरा शहरात  टवाळखोर  रायडर्स  शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय या समोरुन दुचाकी चालवून कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न व सायलेन्‍सरचे विविध विचित्र आवाज उडविण्‍याच्‍या प्रकारामुळे सर्वसामान्‍य नागरीक अक्षरश: त्रासले आहे. त्‍याच बरोबर टवाळखोर रायडर्स विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थीनींची छेड करण्‍याचे प्रकार दिवसेदिवस वाढ होत असून पोलीसांसमोर विद्यार्थीनींची छेड काढली जात असतांनाही पोलीस मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून बघण्‍याची भूमिका केली जात आहे.  यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था सांभाळणा-या पोलीसांवरचा सर्वसामान्‍य व्‍यक्‍तींचा विश्‍वास उडाला आहे.

            शाळा, महाविद्यालय भरण्‍याच्‍या वेळी व दुपार, सायंकाळी सुटण्‍याच्‍या वेळी टवाळखोर रायडर्स शाळा, महाविद्यालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर आपल्‍या महागडया दुचाक्‍या घेऊन येत फटाक्‍यासारखा, विचित्र आवाज सायलेन्‍सरमधून आवाज करतात. त्‍याचप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न वाजवून विद्यार्थी व विद्यार्थींना कानावर हात ठेवण्‍यास भाग पाडतात. शाळा, महाविद्यालय भरण्‍याच्‍या व सुटण्‍याच्‍या वेळी सुसाट वेगाने चकरा मारणे, या चकरा मारीत असतांना लहान-मोठे अपघातही झालेले आहे.  कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा तसेच शहरातील दोनही महाविद्यालय सुरु झालेली असून येथे येणा-या विद्यार्थी व विद्यार्थींनी, पालकांना या टवाळखोर रायडर्सचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. 

         

 कायदा हातात घेण्यास लावू नका  

       सर्वसामान्‍य नागरीकांना दुचाकीचे हॉर्न व सायलेन्‍सरच्‍या आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्‍येक दुचाकी धारकाने घेतली पाहिजे. टवाळखोर  रायडर्स जाणीवपुर्वक दुचाकीमध्‍ये फेरफार करुन विविध प्रकारचे आवाज काढीत असेल तर अशा रायडर्सविरुध्‍द पोलीसांनी नियमानुसार कारवाई केली पाहिजे.टवाळखोर रायडर्स मुलींना कट मारीत असताना समजुन सांगितले असता ते उलटअर्थी बोलतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या टवाळ खोरांच्या तोंडी लागत नाही.पोलिस उघड्या डोळ्याने पाहुणही कारवाई करत नाही.पोलिसांनी सर्वसामान्य नागरीकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये.    

        डाँ.विश्वास पाटील माजी नगरसेवक,  देवळाली प्रवरा   

                                                                                                                         

 पोलीसांनी गस्‍त घालुन कायदेशिर कारवाई करावी

            शाळा व महाविद्यालयाच्‍या परिसरात मोठा कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकींचे प्रमाण वाढले आहे. शाळा सुटल्यानंतर मुलींचा पाठलाग करणे, कट मारणे आदी प्रकार वाढले आहे. त्‍याचप्रमाणे सायंकाळी शतपावली करणा-या महिला व तरुणींना त्रास होईल अशा पध्‍दतीने दुचाकी चालविणे हे थांबविण्‍यासाठी पोलीसांनी या ठिकाणी गस्‍त घालून अशा वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र पोलीसांच्‍या डोळयासमोर हा प्रकार सुरु असतांनाही कोणतीही कारवाई होत नाही. 

        सतिष वाळुंज अध्‍यक्ष, व्यापारी संघटना,देवळाली प्रवरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत