राहुरी : वेबटीम गाढवाच्या शेपटीला डबडं बांधलं की , जसं जसं डबड वाजन तसं तसं गाढव पुढं पळतं..! अशा प्रकारे काही नेत...
राहुरी : वेबटीम
गाढवाच्या शेपटीला डबडं बांधलं की , जसं जसं डबड वाजन तसं तसं गाढव पुढं पळतं..! अशा प्रकारे काही नेत्यांनी या चित्रकार चपराशीला थोडा जवळ केला आणि, हा गडी ' चहापेक्षा किटली गरम' या अविर्भावात वागू लागला, मात्र, म्हणतात ना, गाढवाने कितीही झूल घातले तरी घोडं होऊ शकत नाही, ते गाढव अरबल्याशिवाय राहत नाही, अगदी तसं या चपराशीच्या खोडी काही गेल्या नाही. उलट, डोम कावळागत नजर ठेवून नेत्यांनाही अंधारात ठेवून याने परस्पर पैसा कुठून उकळायचा हे शोधत नवंनवीन फंडे सुरूच केले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी याने चेडगाव, मोकळी आणि खंडांबेच्या काही तरुणांची एका संस्थेत ऑर्डर काढून द्यायची हमी घेतल्याची आणि त्यासाठी ' लाखमोलाची' बोलणी देखील या पठ्याने तोडल्याची धक्कादायक माहिती काल सकाळी एका व्यक्तीने फोनवरून पोहचवली. दरम्यान, चपराशीने निम्मे पैसे अगोदर द्यायची बोली करत त्या पैशांसाठी दररोज फोन केले, पण काहींनी चपराशीच्या लई नादी लागू नका, असे कान टोचल्याने हा डाव फसला. जनतेत कडक कपडे घालून फिरणाऱ्या चपराशीचे दररोज एक-एक ' उद्योग' बाहेर निघत असल्याने त्याने मोठा थयथयाट सुरू केला आहे. राहुरीत जाऊन त्याने काल काही व्यवसाय बांधवांजवळ बरेच पाय आपटले. माझ्यामागे सर्व नेते आहेत, मला समाजात लई किंमत आहे, असा बडेजावही मिरवला, मात्र चपराशीचा काळाठिकुर पडलेला चेहरा त्याच्या वेदना लपवू शकला नाही, असे काहींनी सांगितले. चपराशी हा एक उद्योगी महाभाग आहे, जिथं तिथं नाक खूपसायची सवय लागल्याने भरसभेत एका ग्रामपंचायत सदस्याने चपराशीला तोंडावर जर ग्रामपंचायतमध्ये दिसला, चांगल्या कामात बोटं घातली आणि भाऊसाहेबाला जर फोन केलेला समजला, तरी मग याद राख, असा दम भरला, तेंव्हापासून चपराशीने उंबरे सोडून ब्राम्हणी आणि वांबोरीत तळ ठोकला आहे. मात्र ब्राम्हणीकर देखील याच्या अवगुणाने वैतागले असून, ते देखील लवकरच याला गावात तोंड घालण्यापासून रोखणार असल्याचे काही सुशिक्षित तरुणांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण कल्पना करू शकता याला समाजात किती किंमत आहे. तर, आता चपराशीने आपली मोठी ओळख आहे, असे दाखवून काही नातेवाईकांना गळाला लावले. कुणाचा मुलगा, कुणाचा पुतण्या तर एकाच्या जावयासाठी याने एका संस्थांत ऑर्डर काढून द्यायची तयारी दर्शवली, यासाठी 7 पासून 25 लाखापर्यंत 'बोली' लावली, शिवाय, कुणाला काही बोलायचं नाही, अशी अट देखील या बहदराने घातली आहे. मात्र, काही नागरिकांनी हा दररोज कशाला चकरा मारतो, फोन का करतो, याचा अंदाज काढून ' त्या' लोकांना सावध केले, त्यामुळे यांनी ही रक्कम अद्याप तरी दिलेली नाही, असे समजले. मात्र, ज्या अर्थी या प्रकरणाची बाहेर चर्चा आली, त्या अर्थी चपराशीची खरी किंमत त्यांनी ओळखली असावी, हे नक्की. काल राहुरीतील एका जेष्ठ सहकार्याने चपराशीचे कारनामे वाचून कॉल करत, तो किती खोडीचा आहे, हे मान्य केले. पण, गटारीत दगड मारू नका, त्याची लायकी नाही तुमच्याशी स्पर्धा करण्याची, तो चार ओळीची बातमी स्वतः लिहू शकत नाही, तुमच्या कामाकडे लक्ष द्या, असा वडीलकीचे मार्गदर्शन केले. मी देखील त्यांच्या शब्दाचा मान ठेवून ' त्या' गोष्टी छापणार नाही, अशा शब्द दिला, मात्र, सर, तूम्ही कितीही समजून सांगा कुत्र्याची शेप सरळ होणार नाही, असे ही बोलून दाखवत हातचा राखून ठेवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत