गुरु गोविंदसिंग प्रवेशद्वारास परवानगी द्या! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुरु गोविंदसिंग प्रवेशद्वारास परवानगी द्या!

कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात शीख धर्मियांचे धर्मगुरु गुरु गोविंदसिंग यांचे प्रसिद्ध गुरुद्वारा मंदिर आहे. या गुरुद्वारासमोरुन जाणार्‍या...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


कोपरगाव शहरात शीख धर्मियांचे धर्मगुरु गुरु गोविंदसिंग यांचे प्रसिद्ध गुरुद्वारा मंदिर आहे. या गुरुद्वारासमोरुन जाणार्‍या रस्त्यास ‘गुरुद्वारा मार्ग’ असे नाव आहे. परंतु, विघ्नेश्वर चौकातील पांडे स्वीटजवळ गुरु गोविंदसिंग यांचे प्रवेशद्वार व्हावे, अशी समस्त सर्वधर्मीयांची इच्छा आहे. त्यासाठी पालिकेने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी श्री गुरु सिंग सभेने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे बुधवारी (ता.15) केली आहे.


सदर निवेदनात श्री गुरु सिंग सभेने म्हटले आहे की, शीख बांधवांचे धर्मगुरु गुरु गोविंदसिंग यांचे शहरात भव्य-दिव्य गुरुद्वारा मंदिर आहे. या समोरुन जाणार्‍या रस्त्यास ‘गुरुद्वारा मार्ग’ असे नाव आहे. परंतु, विघ्नेश्वर चौकातील पांडे स्वीटजवळ गुरु गोविंदसिंग यांचे प्रवेशद्वार व्हावे, अशी समस्त सर्वधर्मीयांची इच्छा आहे. यासाठी पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा देखील केलला आहे. परंतु, पालिकेने कानाडोळा केला आहे.


 विशेषतः पालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रस्ताव आल्यास परवानगी दिली जाईल, असे घोषित केलेले आहे. त्यामुळे याकामास लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी मनिंदरसिंग भाटिया, राजसिंग भाटिया, जितेंद्रसिंग पांथीवाल, गौतमसिंग राठोड, सतनामसिंग दिगवा, जसबेंद्रसिंग राठोड, इंद्रजितसिंग लोहिया आदिंनी निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत