सात्रळ महाविद्यालयाला भारत सरकारचे पेटंट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयाला भारत सरकारचे पेटंट

सात्रळ, दि. २७ :  येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने  सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञ...

सात्रळ, दि. २७ : 


येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने  सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राम शिवाजी तांबे यांना भारत सरकारचे पेटंट मंजूर झाले आहे. सात्रळ महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे सात्रळ पंचक्रोशीच्या वैभवात भर पडलेली असून महाविद्यालयाच्याही नावलौकिकात यशाचा तुरा खोवण्यात आलेला आहे.

     प्रा. डाॅ. तांबे यांना "समुद्र आणि नदी प्रदूषणातील तेलगळती स्वच्छतेच्या उद्देशाने तेल खाणारे जीवाणू वितरण यंत्र डिझाईनचे पेटंट" चे गौरवपत्र भारत सरकारकडून प्राप्त झाले आहे. या संशोधन कामासाठी डॉ. राम तांबे यांना प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विक्रम रंगनाथ काकुलते (मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिक) तसेच प्रा. प्रिया राहुल सोनवणे (गोखले एज्युकेशन सोसायटीचे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिक) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

       याप्रसंगी प्रा. डॉ. तांबे म्हणाले,"तेलगळती हा समुद्र आणि नदीप्रदूषणाचा सर्वाधिक भाग असल्याचे दिसत होते. सामान्यत: निष्कर्षण, वितरण, साठवण आणि वापरादरम्यान चुकून तेल सोडले जाते. सागरी जीवांना जास्त धोका निर्माण करून तेल गळतीचा परिसंस्थेवर मोठा नकारात्मक प्रभाव आहे. तथापि, जोखमीची व्याप्ती, सागरी अधिवासाची संवेदनशीलता, मर्यादा यांसारख्या इतर अजैविक घटकांव्यतिरिक्त तेलाच्या प्रकार आणि प्रमाणावर अवलंबून आहे. नदी किंवा समुद्रावर तेल सांडणे,पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेले तेल आणि परिणामी प्रकाशसंश्लेषण वाढविणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रसाराला संरक्षण देते. येथे स्वच्छतेच्या उद्देशाने तेल खाणारे जीवाणू वितरण यंत्र डिझाइन केले गेले आहे. जे तेल शोषणासाठी जीवाणूंना पाण्यात पद्धतशीरपणे वितरित करण्यासाठी वापरले जाते. हे सूक्ष्मजंतू तेलातील काही सर्वात सोपे रेणू तोडण्यात यशस्वी झाले आणि जसजशी जीवाणू पुनरुत्पादन आणि गुणाकार करत राहिले, तसतसे कालांतराने ते सांडलेल्या बहुतेक तेलाचे सेवन करण्यास सक्षम झाले. हे यंत्र पाण्यात पाठविले जाऊ शकते. जे मानवी प्रयत्नांचा समावेश न करता समुद्र स्वच्छ करण्याचे काम करते. समुद्राचे नुकसान कमी करू शकते."

    प्रा. डॉ. तांबे यांची दोन क्रमिक पाठ्यपुस्तके  प्रसिद्ध आहेत. त्यांनी युजीसी, नवी दिल्लीचा व पुणे विद्यापीठाचा प्रत्येकी एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला असून त्यांचे सतरा संशोधन लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. त्यांना उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणासाठी नेपाळ सरकारचा पुरस्कारही प्रदान झालेला आहे.  

      भारत सरकारचे पेटंट मंजूर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे सचिव श्री. भारत घोगरे, शिक्षण संचालक श्री. विजय आहेर, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

     याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. तांबे यांचा सत्कार करताना प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले, उपप्राचार्य प्रा. दिनकर घाणे, प्रो. डॉ. शिवाजी पंडित, डॉ. नितीनकुमार पाटील, आयक्युएसी समन्वयक प्रा. सोमनाथ बोरुडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत