कोपरगाव/वेबटीम:- राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील ५६९२ लाभार्थ्याना दर महिन्य...
कोपरगाव/वेबटीम:-
राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील ५६९२ लाभार्थ्याना दर महिन्याला ५४ लाख ४२ हजार रुपयांची मदत दिली जात असल्याची माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आदी योजना समाजातील विविध वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असतात. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना कमीत कमी ६०० ते १००० रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येत असते. कोपरगाव तालुक्यात या योजनांसाठी आतापर्यंत ५६९२ लाभार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्याच्या बँक खात्यात ५४,४२,००० एवढी रक्कम प्रतिमहा वितरीत करणेत येतअसते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरूष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग , कर्करोग, एडस, कुष्टरोग, इ. दुर्धर आजार या सारख्या आजारामुळे स्वतःचा चरीतार्थ चालवू न शकणारे क्षयरोग,आदी पुरुष व महिला तसेच निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवांसह) घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला अत्याचारीत व वेश्या व्यवसायातुन मुक्त केलेल्या महिला, तृतीय पंथी, देवदासी अशा ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्रीया आणि तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची पत्नी, सिकलसेलग्रस्त सारखे आजार या सर्वांना या अंतर्गत लाभ मिळतो. या योजनांमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत २,५९४ लाभार्थ्याची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. लाभार्थ्याचे बँक खातेत रक्कम रुपये बक खातरक्कम रुपये २५,९४,००० रुपयाची मदत दर महिन्याला दिली जाते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत ६५ वर्षावरील व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे यादीत नाव समाविष्ट असणारे व्यक्तींना निवृती वेतन देण्यात येत असते. या योजनेत २,११२ लाभार्थ्याची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्याचे बँक खातेत १८,९६,७०० रुपयांची मदत दर महिन्याला दिली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय गाराष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत दारीद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात, या योजनेत ७२४ लाभार्थ्याची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. या लाभार्थ्याचे बँक खात्यात रूपये २,१५,३००/- रुपयाची मदत दर महिन्याला दिली जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत वेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडुन प्रतिमहा रुपये २००/- व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्रतिमहा रुपये ४००/- अशी एकूण प्रतिमहा रुपये ६००/- निवृत्ती वेतन अनुज्ञेय आहे.
तसेच कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अजुन काही घटक या योजनांपासून वंचित असल्यामुळे आता प्रत्येक गावात ग्रामपंचायत येथे शिबीर आयोजन प्रत्येक गरजु लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळावा म्हणून दर मंगळवार व शुक्रवार रोजी नियोजन करुन जास्तीत जास्त गरजु लाभार्थ्यांना लाभ देणेबाबत व कोणीही गरजु लाभार्थी यापासून वंचित राहु नये यासाठी कार्यवाही चालू असून गेल्या सप्टेंबर २०२१ पासून आजतागायत २१ गावांत २१ शिबीराचे आयोजन करण्यात आले असून ५४५ इतक्या लाभार्थ्यांनी लाभ मिळणेकरीता तहसील कार्यालयाकडेस अर्ज सादर केलेले आहेत.अशी माहिती ही श्री.बोरूडे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत