राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत भागातील एका बंगल्यातील रूममध्ये भाडेकरू असलेल्या अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत भागातील एका बंगल्यातील रूममध्ये भाडेकरू असलेल्या अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली आहे.
गुरुकुल वसाहत येथील गवारी तलाठी यांच्या बंगला असून खालच्या बाजूच्या रूममध्ये गणेश लक्ष्मण थिटमे निंब्रळ (ता अकोले) हा मजूर भाडेकरू म्हणून राहत होता.
सायंकाळी ६ वाजता तलाठी गवारी हे नगरवरून घरी आले असताना फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने ही बाब पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांना कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस नाईक एस.बी निकम, इफतेखार सय्यद, गणेश फाटक दाखल झाले आहेत.
सदर आत्महत्या करणारा तरुण राहुरी परिसरात मोलमजुरी करत असल्याचे समजते. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत