राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील नागेश्वर मंदिरात श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने श्री.दत्त जयंतीच्या निमित्ताने रविव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील नागेश्वर मंदिरात श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने श्री.दत्त जयंतीच्या निमित्ताने रविवार दि 12 डिसेंबर 2021 पासून गुरुचरित्र सप्ताह पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.
सालाबाद प्रमाणे यंदाही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधिश प.पु.गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने राहुरी फॅक्टरी येथील नागेश्वर मंदिरात श्री दत्त जयंतनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झाला असून या पारायण सोहळ्यात भाविक सहभागी झाले आहेत.
या सोहळ्याची सांगता १९ डिसेंबर २०२१ रोजी होणार असून भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन याचे आयोजन दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र, राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने करण्यात आले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत