विकास मंडळाचे पुर्नजीवन हीच नानांना खरी श्रद्धांजली ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विकास मंडळाचे पुर्नजीवन हीच नानांना खरी श्रद्धांजली !

   राहुरीच्या राजकारणात अनेक दशके विकास मंडळाच्या माध्यमातून राजकीय दबदबा निर्माण करणाऱ्या रामदास पाटील धुमाळ अर्थात नानानंतर विकास मंडळ दिश...

  


राहुरीच्या राजकारणात अनेक दशके विकास मंडळाच्या माध्यमातून राजकीय दबदबा निर्माण करणाऱ्या रामदास पाटील धुमाळ अर्थात नानानंतर विकास मंडळ दिशाहीन झाले, फकत दिशाहीन नव्हे तर ते स्वाभिमान आणि अभिमान गहाण ठेवून आलेल्या काही कार्यकर्त्यांमुळे  आज नावालाही राहिले नाही, हे वास्तव आहे. आज नानांच्या स्मृतीस अभिवादन करताना त्यांना सुमनांजली अर्पण करण्याऐवजी तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सभासद, व्यापारी अशा प्रत्येक घटकाला आपले जिव्हाळ्याचे वाटणारे सर्वपक्षीय 'विकास मंडळ' पुन्हा जिवंत करणे, यापेक्षा नानांना मोठी श्रद्धांजली दुसरी कोणतीही असणार नाही.

   धुमाळ नाना म्हंटल की विकास मंडळ नजरे समोर उभे राहते. नानांनी सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्यांनी जिल्ह्यातील कारखाने 1500-1700 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करत असताना 2105 रुपयांचा भाव काढून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या आयुष्यात खऱ्याअर्थाने गोडवा आणला.त्यामुळे नाना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यापूर्वीही नानांनी राहुरीच्या राजकारणात तनपुरे विरोधक म्हणून आपला गट कायम ठेवला. त्यांनी विश्वासू कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास मंडळाला आणखी गती देताना जनतेचा विश्वास संपादन केला.मात्र, अनेकांनी कारखान्यात, पंचायत समिती असेल किंवा अन्य ठिकाणी नानांच्या माध्यमातून पदे भोगली, मात्र त्यांना नंतर नानांचा आणि आपल्याला ज्या विकास मंडळाने मोठे केले त्याचाही दुर्दैवाने विसर पडला.नाना जिवंत  होते तो पर्यंत विकास मंडळाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान देखील जिवंत होता. मात्र, नाना गेले आणि काही धूर्त लोकांनी विकास मंडळ नामशेष करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनात ' परिवर्तन' घडवले. सत्तेच्या दलालांनी विकास मंडळाचा केसांनी गळा कापला.  त्यामुळे अनेक नेत्यांच्या त्यागातून उभे राहिलेले विकास मंडळ केवळ राजकीय उत्तराधिकारी निष्क्रिय लाभले, काही स्वार्थासाठी सोडून गेले,त्यामुळे आज कागदावरही राहिले नाही, ही शोकांतिका आहे. विकास मंडळ ही एक सर्वसामान्यांची ऊर्जा आहे, प्रेरणा शक्ती आहे, एक विरोधी बुरुज ढासळवू शकणारी बुलंद तोफ आहे, मात्र दुर्दैवाने याचा राहुरीकराना विसर पडला आहे. आपले अस्तित्व हरवून बसलेल्या विकास मंडलाच्या कार्यकर्त्यांना आज नानाना श्रद्धांजली वाहण्याचाही नैतिक अधिकार नाही. नानाविषयी खरच प्रेम, आदर असेल, तर त्यांना अभिप्रेत असलेले शेतकर्यांच्या हिताचे, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे 'विकास मंडळ' पुन्हा पूर्ण ताकदीने उभे करणे अपेक्षित आहे, हीच नानाना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आणि ही ताकद राहुरीतील नानांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यामध्ये आजही आहे. सत्यवान पवार, अमृत धुमाळ, चाचा तनपुरे, विजय डोले, सुरसिंगराव पवार, उत्तमरावं म्हसे,किशोर वने, डॉ जयंत कुलकर्णी, डॉ धनंजय मेहत्रे या अनुभवी कार्यकर्त्यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून आज नानांच्या अभिवादन सभेत विकास मंडळ पुनरजीवन करण्याबाबत जाहीर संकल्प करणे अभिप्रेत आहे. या, क्रांतीत किती कार्यक्रत्ये नानांच्या अभीवचनाला जागतात, हे पाहण्यासाठी राहुरी तालुक्यातील तमाम जनतेचे याकडे लक्ष असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत