एक स्माईल ; पण, चपराशीची उतरविली तिने स्टाईल ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एक स्माईल ; पण, चपराशीची उतरविली तिने स्टाईल !

 वांबोरी : वेबटीम                 'तरवडला दरवेळी मोहळ सापडणंच अस नाही', अशी एक जुनी म्हण आहे, मात्र, ही म्हण जुनी असली तरी तिचा नवा ...

 वांबोरी : वेबटीम

                'तरवडला दरवेळी मोहळ सापडणंच अस नाही', अशी एक जुनी म्हण आहे, मात्र, ही म्हण जुनी असली तरी तिचा नवा प्रत्यय गेल्या महिन्याच्या एका बुधवारी उंबरेच्या त्या चपराश्यालाही आला.  एका नोकरदार महिलेला लिफ्ट देण्यासाठी या गड्याने गाडी थांबवली, ती गाडीवर बसली देखील, पण याला न राहवून याने आपल्या 'नको ते शब्द वापरले आणि मग नको तेच झाले.!  हा किस्सा वांबोरी परिसरातील आहे. एक नोकरदार महिला भगिनी दररोज कामानिमित्त एका जवळच्या भागात जाते, ती कधी जाते, कधी निघते, ते उंबरेच्या या गड्याला चांगलेच माहिती होते, त्यामुळे हा गडी दररोज तिच्या वेळेला तिकडे जात असत. कधी बिचारी महिला पतीच्या गाडीची वाट पाहत रोडवर उभी असे, तर कधी रिक्षाची.. त्यावेळी काय मॅडम झाली का सुट्टटी, आल्या का ...! असे गोड गोड बोलून गड्याने ओळख काढलीच, दररोज गप्पा मारून ओळख वाढवली, मी मोठा चित्रकार आहे, आपले कारखान्यात वजन आहे, चेअरमन शब्दापुढे नाही, वांबोरीतही माझ्या शब्दला किंमत आहे, काहीही अडचण येउद्या, कुणाकडेही काम असुद्या, मी करून देईल, अशी गोड गोड बतावणी करून त्याने जवळीक साधली, एका बुधवारी तर ती रस्त्यावर उभी असताना, या गड्याने तिला गाडीवर बसवले आणि गाडी थोडी पुढे गेल्यावर त्याला धीर आवरेना, आणि त्याने त्या भगिनीकडे नको ती मागणी केली, आता मात्र अचानक तिचा संयम सुटला आणि कन्या शाळेच्या अलीकडील कॉर्नरला तिने  गाडी थांबायची सांगत थेट पतीला फोन लावला,  यावेळी त्याने मॅडम, मॅडम, मला असे नव्हते म्हणायचे..तुमचा गैरसमज झाला, आशा शब्दात विनवणी केली, मात्र काही वेळातच तिचा पती तिथे दाखल झाला आणि त्याने व तिने या गड्याला नको नको त्या शिव्या घातल्या, यावेळी त्याने अक्षरशः हात जोडत जवळच्या एका मित्राला बोलावलं, त्याने तिथं धाव घेऊन हे प्रकरण मिटवले, मात्र याचवेळी गावातील काही लोकांनी रस्त्याच्या कडेला सुरू असलेला गोंधळ पहिला आणि आपल्या नमुना काय उद्योग करू शकतो, हे माहित असल्याने सुतावरून स्वर्ग गाठला, या प्रकरणानंतर त्या चपराश्याला दरवेळी 'तरवडला' मोहळ सापडत नसत, ही अद्दल घडली. क्रमशः ( उद्याच्या भागात वांबोरी फाट्यावरील चपराशी भाऊचा  पराक्रम) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत