राहुरी ः वेबटीम शाळेच्या ठिकाणी राजकीय जोडे बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य नसतानाही ...
राहुरी ः वेबटीम
शाळेच्या ठिकाणी राजकीय जोडे बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य नसतानाही 'वरतडेने' नाहक लुडबूड करून गावातील आणि शाळेतील शांतता भंग करू नये, असे आवाहन शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तसेच संजय गांधी निराधार योजनेचे शासकीय सदस्य दिपकराव पंडीत यांनी केले आहे.
पंडित म्हणाले,
उंबरे शाळा व्यवस्थापन समिती ही राजकीय समिती नाही. काहींनी एखाद्या चांगल्या आणि सुशिक्षित माणसाला विरोध करण्यासाठी किंवा पत्रकारितेतील एकमेकांवरील खुन्नस काढण्यासाठी त्याला राजकीय रंग चढवला आहे, परंतु, गावच्या हितासाठी राजकीय नेत्यांची चपराशी करणार्यांनी स्वतःला शाळेपासून दोन हात दूर ठेवावे. शाळेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण असावा, याचा निर्णय समिती घेईल. तसेच शाळेत काय सुधारणा करायच्या किंवा अन्य काय विकास करायचा, हे देखील सर्व सदस्यांना समजते. सर्व सदस्य हे तरूण आणि सुशिक्षीत आहे. त्यांना तेथे कारभार करू द्यावा, विनाकारण गावातील त्रयस्थ व्यक्तीने नको तिथे नाक खुपसू नये. जेणेकरून शाळेतील वातावरण बिघडेल आणि मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल.
शिक्षकांनीही काम करताना, तटस्थ भूमिका घेवून काम करावे. नूतन सदस्यांनीही देखील चुकीला चुकीचे म्हणण्याची दानत ठेवावी. मुलांचे शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, मुलींसाठी स्वच्छतागृह, शाळेचा भौतिक विकास, शिक्षकांची अपुरे संख्याबळ, त्यांना येणार्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावेत आणि शाळा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकांची बनेल, यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंडीत यांनी केले.
गावातील सर्व घटकांना विचारात घेवून प्रमुख नेत्यांनी गावचा गाडा हाकायचा असतो. मात्र, ज्यावेळी ते एकाच बाजुने झुकतात, त्यावेळी मात्र तरुणांकडून क्रांती घडते. अशीच काहीसी परिस्थिती उंबरेतही दिसत आहे. आता तरुणाई पुढे येताना दिसत आहे. त्यांना राजकारणाचा कंटाळा आला असून, आपल्या शाळेचा, परिसराचा आणि गावचा विकास हवा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत