ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा

राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन...

राहुरी(प्रतिनिधी)


राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे नुजिविडू सीडस लि. व के.एस अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा व चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नुजिविडू सीडसव कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत काटोळे, पी.डी.व्यवस्थापक राजीव बिराजदार, रविंद्र वाट, प्रेम बाभूळके, ज्ञानेश्वर उदागे, के.एस. अँग्रोचे प्रमोद मुसमाडे, तुषार मुसमाडे आदि उपस्थित होते. यावेळी नुजिविडू सीडसकंपनीचे आशा एन.सी.एस ९०-११ या कपाशी वाणाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. प्रसंगी व्यासपीठावर अण्णा आरंगळे, गोवर्धन मुसमाडे, डॉ.वारुळे, बबन शिंदे,गणेश कोतकर, अविनाश आरंगळे, बाबासाहेब कोतकर, श्री.सालबंदे, गोकुळ शिंदे, सुरेश वारुळे, अमोल संसारे, राहुल गावडे, प्रसाद शिंदे, अविनाश काळे, मनोज संसारे, सौ.आरंगळे, उज्ज्वला मुसमाडे, आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा लकी ड्रो काढण्यात येऊन भाग्यवान १० शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले. तर आण्णा आरंगळे सर यांना भव्य लकी ड्रोमध्ये टीव्हीबक्षीस प्रदान करण्यात आले. प्रसंगी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद मुसमाडे, तुषार मुसमाडे, शुभम शेळके आदींसह ब्राम्हणगाव भांड परिसरातील शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत