कोपरगावचे भुमीपुत्र रितेश रणधीर केंद्रीय लोकसेवा आयोग उत्तीर्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे भुमीपुत्र रितेश रणधीर केंद्रीय लोकसेवा आयोग उत्तीर्ण

  कोपरगाव(प्रतिनिधी) :- कोपरगाव तालुक्याचे भुमीपुत्र श्री.रितेश सुभाष रणधीर साहेब हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ए.सी.पी परीक्षा उत्तीर्ण झ...

 कोपरगाव(प्रतिनिधी) :-


कोपरगाव तालुक्याचे भुमीपुत्र श्री.रितेश सुभाष रणधीर साहेब हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ए.सी.पी परीक्षा उत्तीर्ण झालेनंतर प्रशिक्षणासाठी गुडगांव (हरियाणा) येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते... आज दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होत आहे.त्यांचा दिक्षांत समारंभ आज दिल्ली येथे पार पडला असून त्यांची पहिली नियुक्ती झारखंड येथे होत आहे.


कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष रणधीर यांचे ते सुपुत्र व आई कोपरगावचे जुने घराणे कोपरे कुटुंबातील आहे.श्री.रितेश रणधीर  (ACP) साहेब यांचे शिक्षण कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेज आणि इंग्लंड येथे पार पडले असून केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहे.त्यांच्या या कष्टाचा सार्थ अभिमान रणधीर आणि कोपरे कुटुंबाना वाटत असून नागरिकांचा व पदाधिकाऱ्यांचा सर्वच स्तरावरून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.त्याच बरोबर कोपरे व रणधीर कुटुंबातील नातेवाईकांमध्ये व तसेच कोपरगाव येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत