कोपरगाव(वेबटीम) प्रयत्नवादी व्यक्तीच्या आयुष्यात यश-अपयशाच्या घटना घडतच असतात. मात्र, हे घडत असताना तुम्ही प्रयत्न किती व कशा पद्धतीने करता...
कोपरगाव(वेबटीम)
प्रयत्नवादी व्यक्तीच्या आयुष्यात यश-अपयशाच्या घटना घडतच असतात. मात्र, हे घडत असताना तुम्ही प्रयत्न किती व कशा पद्धतीने करतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे जीवनात ध्येयाची तयारी करताना अगोदर स्वतःला ओळखा म्हणजे तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही, असे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. शुभम केनेकर यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व के. जे. सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रापंचायत सदस्य राहुल ( दादा ) टेके पाटील यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी तयारी स्पर्धा परीक्षांची या विषयावर बुधवारी (दि.२२) व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना केनेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा. शिरीष सूर्यवंशी, कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, " लोकमत" चे उपसंपादक रोहित टेके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राहुल दादा टेके पाटील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या प्रतिमा पूजनाने कारण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. वसुदेव साळुंके यांनी तर मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले.
प्रा. केनेकर म्हणाले, विधार्थी दशेत असताना भविष्याच्या दुर्ष्टीने गोष्टी लादल्या जातात. त्यामुळे बऱ्याच विध्यार्थ्यांना पालकांच्या, नातेवाईकच्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची सक्ती केली जाते. मात्र, त्या विधार्थ्याला काय करायचे, कोणते क्षेत्र निवडायचे हे कोणीच विचारात नाही. त्यामुळे घरचांची इच्छा म्हूणन एकाद्या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्याची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ज्याची आवड आहे तेच करा. अध्यक्षीय भाषणांत अशोकराव रोहमारे म्हणाले, राहुल टेके यांचे कार्य खूप मोठे होते. परंतु, कोरोनाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. मात्र, त्यांच्या कार्याचा वसा त्यांच्या नावाने ट्रस्ट काढून सुरु ठेवल्याची चांगली बाब आहे. या व्याख्यानासाठी विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय दवंगे यांनी केले तर प्रा.डॉ. रवींद्र जाधव यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत