सहकारात शिस्त पाळून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून कर्ज फेडल्यास सोसायट्यांचे भविष्य उज्जवल- माजी खासदार तनपुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सहकारात शिस्त पाळून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून कर्ज फेडल्यास सोसायट्यांचे भविष्य उज्जवल- माजी खासदार तनपुरे

    राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सहकारी सोसायट्या ग्रामीण अर्थकारणाच्या शेतकऱ्याच्या विकासात मोलाच्या ठरले आहेत शेतकऱ्यांनीही सहकारात आर्थिक शिस्त...

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


सहकारी सोसायट्या ग्रामीण अर्थकारणाच्या शेतकऱ्याच्या विकासात मोलाच्या ठरले आहेत शेतकऱ्यांनीही सहकारात आर्थिक शिस्त पाळताना घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून वेळेवर कर्जफेड केल्यास संस्थांचे भवितव्य उज्वल असेल व शेतकऱ्यांची प्रगतीची वाट रुंदावत जाईल असा आशावाद माखा प्रसादराव तनपुरे यांनी व्यक्त केला.


 गुहा तालुका राहुरी येथील प्रेरणा विविध कार्यकारी सोसायटीच्या 19व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी डॉ तनपुरे कारखाना माजी संचालक उत्तमराव कोळसे होते  राहुरी तालुक्यात ५४ सालापासून स्वर्गीय दादासाहेब तनपुरे यांनी सहकारी सोसायट्या जपण्यासाठी कारखान्यातून सोसायट्यांना अग्रक्रमाने वसूल देण्याचे धोरण राबविले त्याच शिस्तीची पुन्हा गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली.


 प्रेरणा सोसायटीचे चेअरमन शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे म्हणाले की,  राहुरी तालुका स्वर्गीय दादासाहेबांच्या आशीर्वादातून सहकाराचा जनक ठरला आहे प्रेरणा विकास सोसायटीने आर्थिक शिस्त पाळताना गेल्या १९ वर्षात सभासद पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली दिली आहे तालुक्यात एकूण ११० सोसायटी  मध्ये आपल्या संस्थेच्या नावलौकिक चांगला आहे.कर्ज घेउन वेळेवर भरल्यास संस्थेस निश्चित च फायदा होतो . कर्ज वसुली हा संस्थेचा आत्मा असून यातूनच ग्रामीण अर्थकारण सक्षम होईल .जिल्हा सहकारी बँकेने गृहकर्ज पीक कर्ज व इतर कर्ज यासाठी असलेल्या अटी शिथिल करून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते मा.खा प्रसादराव तनपुरे यांनी प्रयत्न करावेत तसेच बँकेकडे गाय गोठा म्हणून घेतलेले कर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळविल्यास शेतकरी पुढील पीक कर्जासाठी पात्र राहतील यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडे प्रयत्न करण्याची मागणी वाबळे यांनी केली .गावपातळीवर काम करताना राजकारणातून संस्थांचे आर्थिक नुकसान झाले . त्यासाठी प्रशिक्षित संचालक व सचिव असावे .तसेच जास्तीत जास्त सभासदांनी कर्ज घेऊन प्रगती साधावी व कर्जफेड वेळेवर परत फेड करून संस्थेच्या प्रगती साठी हातभार लावावा असे आव्हान श्री वाबळे यांनी केले .



कार्यक्रमास प्रेरणा पतसंस्था व्हा. चेअरमन मच्छिंद्र शिंदे प्रेरणा मल्टिस्टेट व्हा. विष्णुपंत वर्पे संचालक अशोक चंद्रे ,मारुती लांबे मच्छिंद्र हुरुळे , सुजित वाबळे ,राजेंद्र सौदागर, रविंद्र शिंदे , जगन्नाथ वर्पे संजय शिंदे ,शौकत सय्यद, अशोक आंबेकर शिवाजी उर्हे , संजय शिंदे, डॉ. वाबळे संजय लांबे, सादीक सय्यद सर ,बबननाना कोळसे , रविंद्र हिवाळे  व सर्व ग्रामपंचायत सदस्य  संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे व्हा. चेअरमन अशोकराव उर्हे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत