अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव डेपोतुन शिवसेनेच्या सरंक्षणात पहिली बस धावली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव डेपोतुन शिवसेनेच्या सरंक्षणात पहिली बस धावली

कोपरगाव प्रतिनिधी:-   सध्या एस.टी. कर्मचारी बांधवांचा संप चालु असुन ८ नोव्हेबर पासुन हा संप संपूर्ण महाराष्ट्रात चालु आहे.या कारणामुळे सामान...

कोपरगाव प्रतिनिधी:- 

सध्या एस.टी. कर्मचारी बांधवांचा संप चालु असुन ८ नोव्हेबर पासुन हा संप संपूर्ण महाराष्ट्रात चालु आहे.या कारणामुळे सामान्य नागरिकांचे प्रंचड हाल होत आहे.दिवाळी सणामध्ये नागरिकांचे हाल झाले होते.परंतु अद्यापही हा संप मिटला नाही. विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांचे नुकसान होत आहे. गेल्या एक महिण्यानंतर  दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगारात पहिली बस कोपरगाव श्रींरामपुर या मार्गावर धावली आहे.यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असुन शिवसेना व पोलिस प्रशासनाच्या सरंक्षणात पहिली बस कोपरगावमध्युन सुरु झाली आहे.या बस चा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते शुंभारंभ करण्यात आला आहे.नागरिकांचे हाल बघून शिव सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख कलविंदरसिंग डडियाल यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यासह कर्मचारी यांना संरक्षण दिले असुन बस रवाना केली आहे.कोपरगाव डेपो मॅनेजर. अभिजित चौधरी, जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख कलविंदरसिंग डडियाल, शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाअध्यक्ष इरफान शेख ,बाळासाहेब सांळुके, ग्राहक संरक्षण मंचाचे राहुल देशपांडे योगेश उशीर, मंगेश देशमुख, उमेश छुगाणी  एसटी कामगार सेनेचे राजाभाऊ वाघमारे मुन्ना आव्हाड,कोपरगाव आहारातील सुपरवायझर टकाळकर मँडम याच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पोलिस प्रशासन यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातुन कोपरगाव आगारातील पहिली बस धावली आहे.शिर्डी बाबळेश्वर, श्रीरामपुर ह्या मार्गावरून शेख हे चालक असुन आणि वाघ,कराळे यांनी वाहक म्हणून कामगिरी केली आहे.या कर्मचार्यांचा सत्कार राजेंद्र झावरे यांनी केला असुन सर्वसामान्यांची लालपरी रस्त्यावर संपानंतर पहिल्यादाच धावली आहे.या बसला सर्वसामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.याप्रसंगी राजेंद्र झावरे म्हणाले की,एस.टी. कर्मचारी बांधवांचा संप चालु आहे.बहुतेक मागण्या पूर्ण झाल्या आहे.एकच मागणी बाकी असुन ती म्हणजे विलीनीकरण होय.विलिनिकरणाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असुन यावर लवकरच न्यायालयात तोडगा निघेल तो पर्यत सामान्य नागरिकांची हाल होत आहे.सामन्य जनतेला वेठीस न धरता कर्मचारी यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.शिवसेना व पोलिस प्रशासनाच्या सौरक्षणात .एस.टी.चालु झाल्या मुळे सामान्य नागरिक प्रवासी वर्गात आनंद निर्माण  झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत