पिंप्री- वाळण येथील वादग्रस्त मंदिराची अखेर धर्मदाय आयुक्तांकडे कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिर ट्रस्टची नोंद ,फलक लावला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पिंप्री- वाळण येथील वादग्रस्त मंदिराची अखेर धर्मदाय आयुक्तांकडे कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिर ट्रस्टची नोंद ,फलक लावला

राहुरी/वेबटीम:-         राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण गावांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त असलेल्या धार्मिक मंदिराबाबद कान्होबा उर्फ...

राहुरी/वेबटीम:-

 



     राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण गावांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त असलेल्या धार्मिक मंदिराबाबद कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिर सार्वजनिक देवस्थान विश्वस्त मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्त अहमदनगर कार्यालयात झाली असून सदर नोंदणीपत्र विश्वस्तांकडे सुतूर्फ करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी सदर धार्मिक स्थळी कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज मंदिर असा फलक देखील  विश्वस्तांच्या वतीने लावण्यात आला  असल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष यशपाल पवार यांनी दिली आहे. 

     राहुरी तालुक्यातील प्रिंप्री-वळण येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिर देवस्थान वरून दोन समाजामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सदर वादामुळे अनेक वेळा या ठिकाणी तणावग्रस्त वातावरण देखील बनले होते. त्यामुळे हा प्रश्न जिल्हात गाजला होता आता या देवस्थानची धर्मदाय आयुक्त कार्यालयात कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिराची नोंद झाली असल्याची माहिती देत या ठिकाणी फलक लावुन ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

    विश्वस्तपदी जालिंदर कानडे, भगवान कानडे, शरद डुकरे, लक्ष्मण साळवे, जालिंदर कानडे, जगन्नाथ जाधव ,विलास कानडे ,जालिंदर आगलावे, किशोर पुंड, बाबासाहेब डमाळे यांची नियुक्त करण्यात आली आहे.फलक लावण्यासाठी कासम बांपूभाई शेख, दगडू साळेव,युवराज पवार, सखाराम पवार,मच्छिद्र कानडे,

फक्कड जाधव,फकिरचंद आगलावे,सुरेश बनकर,आबासाहेब लहारे,शिवाजी डमाळे, राधेशाम जाधव,लखन कानडे,सुनिल कानडे,गोरक माळी,सागर जाधव,महेश जाधव,सतिष जाधव,सतिष पंडीत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत