आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक संपन्न

कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव नगरपरिषदेची निवडणुक लढविण्याची आग्रही मागणी बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी आज केली. भारतीय जनता पार्टीच्या (वसंत ...

कोपरगाव(वेबटीम):-

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणुक लढविण्याची आग्रही मागणी बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी आज केली. भारतीय जनता पार्टीच्या (वसंत स्मृती कार्यालय) जेष्ठ नेत्यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा-विनिमय केल्यानंतर आगामी नगरपरिषद, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रपक्षांसोबत अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावी असेच मत अनेकांनी मांडले. गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व प्रकारच्या अडचणी-अडथळे यांना तोंड देत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. त्याच कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

           जेष्ठ नेते श्री.रामदासजी खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस श्री. वाल्मिकराव भोकरे, सतिशशेठ कृष्णानी, नामदेवराव जाधव, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, संजय कांबळे, नवनाथजी जाधव, प्रभाकरजी वाणी, रविंद्र बागरेचा, विनीत वाडेकर, छनूदास वैष्णव, भाऊसाहेब कासार, पाटील सर, नंदू जोशी, कैलास सिनगर, राजेंद्र खैरे, मुकुंद कालकुंद्री, संजय कानडे, योगेश वाणी, किरण थोरात, धनू परदेशी, कांबळे, अविनाश पानगव्हाणे, प्रविणजी बागरेचा, बडजाते, वायखिंडे, उदावंत, जाधव इ. उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत