कोंढवडच्या लोकनियुक्त सरपंच आशदेवी म्हसे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोंढवडच्या लोकनियुक्त सरपंच आशदेवी म्हसे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

  राहुरी(वेबटीम):- तालुक्यातील कोंढवड येथील विविध विकास सेवा संस्थेच्या माजी चेअरमन व कोंढवड च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी उत्तमरा...

 राहुरी(वेबटीम):-


तालुक्यातील कोंढवड येथील विविध विकास सेवा संस्थेच्या माजी चेअरमन व कोंढवड च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी उत्तमराव म्हसे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नगर येथील माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला.


सदर कोंढवड च्या सरपंच विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष व डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते उत्तमराव म्हसे पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती तथा माजी सरपंच साहेबराव म्हसे व शिवसेना नेते संभाजीराव पेरणे यांनी अभिनंदन केले आहे.


सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तिंना सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येऊन यावर्षी २०२१ चा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार कोंढवड च्या विद्यमान प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे यांना जाहीर करण्यात आलेला आहे.


 २३ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर येथील माऊली संकुलन सभागृह या ठिकाणी  सरपंच सेवा संघाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, सोशल मिडिया प्रमुख रोहीत पवार, व राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी हा पुरस्कार कोंढवडच्या लोकनियुक्त सरपंच यांना दिल्याबद्दल कोंढवडच्या उपसरपंच कविताताई म्हसे, बंडू म्हसे, माजी उपसरपंच इंद्रभान म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, संभानाना म्हसे, संदीप शेजवळ, मिनाक्षी म्हसे, जयश्री म्हसे, सुनिता म्हसे आदींनी सरपंच सेवा संघाचे आभार मानले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत