'लस' घेतली नसेल तर आता तुम्हाला 'या' ठिकाणी भेटणार नाही प्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'लस' घेतली नसेल तर आता तुम्हाला 'या' ठिकाणी भेटणार नाही प्रवेश

अहमदनगर/वेबटीम:- अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्राॅनचा शिरकाव आणि काेराेनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लसीकरणावर...

अहमदनगर/वेबटीम:-


अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्राॅनचा शिरकाव आणि काेराेनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लसीकरणावर भर देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लादलेत. सार्वजनिक ठिकाणी लस नसणाऱ्यांना प्रवेशास निर्बंध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिल्या आहेत.


 *लसीचा किमान एक डोस बंधनकारक* 

शासकीय, निमशासकीय, खासगी, व्यावसायिक, औद्योगिक, हाॅटेल, रेस्टाॅरंट, शाॅपिंग माॅल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लाॅन्स, मंगल कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, इतर समारंभ, मेळावे यांच्यासह सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात "नाे लस, नाे एन्ट्री"चे निर्बंध जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. कार्यस्थळी लसीचा एक डाेस घेतल्याचे बंधन असणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवेश देऊच नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.


 *मास्कची सक्ती* 

 याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे  बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे तंताेतंत पालन करण्याचे  बंधन असल्याचे आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत