राहूरी(वेबटीम):- महिला संघटित व आर्थिक साक्षर झाल्यास गावचा विकास वेगाने होईल असे प्रतिपादन कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी महिला बचत गटां...
राहूरी(वेबटीम):-
महिला संघटित व आर्थिक साक्षर झाल्यास गावचा विकास वेगाने होईल असे प्रतिपादन कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी महिला बचत गटांच्या ग्रामसभेत केले.
राहुरी तालुक्यातील कणगर येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांना संघटित करून १७ बचत गटांची स्थापना करण्यात आली.
उमेद अभियाना अंतर्गत तालुका व्यवस्थापक प्रवीण गायकवाड व प्रभाग समन्वयक अशोक खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजाता मडवी, स्नेहल जाधव, प्रियांका विधाते, सुजाता लोहकरे यांनी वाड्यावस्त्यांवर जावून महिलांना भेटून बचतीचे महत्त्व लक्षात आणून दिले. व १५ व्या दिवशी ग्रामपंचायत समोर ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी बोलताना सरपंच घाडगे यांनी महिलांचे स्वागत करून कणगर गावातील महिलांचे जास्तीत जास्त बचत गट स्थापन करून गावातील महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून छोटे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करेल असे सांगितले.
गावातील महिलांना संघटित करून बचत गट स्थापन करणेसाठी सौ. सुरेखा भांड यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच बाबासाहेब गाढे, नंदाताई घाडगे, ग्रामविकास अधिकारी श्री.पवार,ताराबाई गाढे, आरती गाढे, संगीता खाटेकर, यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत