राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री. दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री.गुरुचरित्र पारायण सोहळा रविवार दि...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री. दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री.गुरुचरित्र पारायण सोहळा रविवार दि १२ डिसेंबर ते शनिवार १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवर्य ह.भ.प रघुनाथ महाराज उंबरेकर आणि ब्रह्मलीन ह.भ.प श्रीहरी महाराज भालेकर यांच्या कृपा आशिर्वादाने व ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे व ह.भ. प भास्करराव तांबे यांच्या नेतृत्वाखाली श्री. दत्त जन्मोत्सवनिमित्त रविवार 12 डिसेंबर ते रविवार 19 डिसेंबर 2021 या कालावधीत श्री.गुरुचरित्र पारायण , आरती, खिचडी प्रसाद वाटप, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज 11 वाजता होणाऱ्या प्रवचन सेवेत रविवार 12 डिसेंबर रोजी ह.भ.प सुभाष महाराज विधाटे, सोमवार 13 डिसेंबर रोजी ह.भ.प बाबासाहेब महाराज वाळुंज, मंगळवार 14 डिसेंबर रोजी ह.भ.प बाबा महाराज मोरे, बुधवार 15 डिसेंबर रोजी ह.भ.प दुर्गाप्रसाद महाराज तिडके, गुरुवार 16 रोजी नामदेव महाराज जाधव, शुक्रवार 17 डिसेंबर रोजी विनोद महाराज मुसमाडे, शनिवार 18 डिसेंबर रोजी ह.भ.प वीर भाऊसाहेब यांची प्रवचने होणार आहेत.
दररोज परिसरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मंडळीकडून प्रसाद, चहा-पान व्यवस्था करण्यात येणार आहे.
शनिवार दि.19 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता माजी आमदार चंद्रशेखर कदम व सौ.प्रियतमा कदम यांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे. तसेच रविवार दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ह.भ.प भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास परीसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.दत्त मंदिर भक्त परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत