आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते

कोपरगाव प्रतिनिधी  :-  कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार तुकाराम बाळनाथ जाधव ...

कोपरगाव प्रतिनिधी  :- 


कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार तुकाराम बाळनाथ जाधव यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ६ लाख २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांचे वारसांना देण्यात आला.



  कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळून आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा कुटुंबाची झालेली आर्थिक ओढाताण दूर होण्यासाठी या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून  संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या कर्जदारांची ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे. संस्थेचे कर्जदार असलेले नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी  येथील रहिवासी असलेले स्व. तुकाराम बाळनाथ जाधव यांचा देखील संस्थेने रु.७,००,०००/- रुपयांचा विमा उतरविलेला होता. तुकाराम बाळनाथ जाधव यांचे अपघाती निधनानंतर संस्थेने ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद जाधव यांच्या वारसांना पॉलिसिपोटी ६ लाख २० हजार रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटना विमा रक्कम मंजूर केली.त्या रक्कमेचा धनादेश नुकताच मयत जाधव यांच्या वारस पत्नी श्रीम. छाया तुकाराम जाधव व मुलगा महेश जाधव यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन राधु कोळपे, व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे, संचालक बाबुराव थोरात,गोरक्षनाथ दवंगे, मॅनेजर बी.डी. काळे, सुभाष बढे, वसुली अधिकारी मच्छिंद्र कुदळे,ओरीएंटल इंशुरन्सचे विभागीय अधिकारी संतोष अग्रवाल, कोपरगाव शाखाधिकारी वर्धमान पांडे, विमा प्रतिनिधी कैलास पांडे आदी उपस्थित होते.





             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत