किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा परवानाधारक हत्यारासह कर्जत पोलिसांकडून अटक.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा परवानाधारक हत्यारासह कर्जत पोलिसांकडून अटक..

  नगर विशेष प्रतिनिधी:- भरत नामदेव मांडगे वय 45 वर्षे धंदा शेती रा. रेहकुरी ता. कर्जत जि. अहमदनगर मो नं 9834689824 समक्ष कर्जत पोलीस स्टेशनल...

 नगर विशेष प्रतिनिधी:-


भरत नामदेव मांडगे वय 45 वर्षे धंदा शेती रा. रेहकुरी ता. कर्जत जि. अहमदनगर मो नं 9834689824 समक्ष कर्जत पोलीस स्टेशनला हजर होवून लेखी फिर्याद दिली की


मौजे रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमिन गट नं. 70.71,72,73 मध्ये एकुण 75 एकर क्षेत्र आहे सदरचे क्षेत्र हे बरेच वर्षापासून आमचे भावकीतील पुर्वीचे चार कुटूंब वहीत करून शेत जमिन खात होते व कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो परंतु आमचे भावकीतील संदिप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याचे घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदिप छगन मांडगे याने इतर दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कर्जत विभाग कर्जत येथे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना आज दि.30/12/2021 रोजी मा. उप विभागीय दंडाधिकारी सो कर्जत विभाग कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमचे भावकीतील बरीच मंडळी तारखेस आलेलो होतो. मा. उप विभागीय दंडाधिकारी सो कर्जत विभाग कर्जत येथील तारीख झाल्यानतंर मी, शांतीलाल बाबु मांडगे वय 60 वर्षे रोहीदास खंडू मांडगे वय 75 वर्षे , शहाजी बाबू मांडगे वय 55 वर्षे आश्रु यशवंता मांडगे वय 70 वर्षे भानुदास यशवंत मांडगे वय 80 वर्षे, हारीभाऊ आन्ना मांडगे वय 55 वर्षे, नारायण देवीदास मांडगे वय 50 वर्षे, आप्पा गंगाराम मांडगे वय 55 वर्षे, धनराज खंडू मांडगे वय 50 वर्षे सर्व रा. रेहकुरी ता. कर्जत जि. अहमदनगर असे आम्ही सांयकाळी 06.00 वा चे सुमारास कर्जत येथील मा. उप विभागीय दंडाधिकारी सो कर्जत विभाग कर्जत येथील गेटजवळ आम्ही थांबलो असताना त्यावेळी संदिप छगन मांडगे वय 32 वर्षे सचिन छगन मांडगे वय 30 वर्षे दोन्ही रा. रेहकुरी ता. कर्जत असे आले त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटार सायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी सदर मोटारसायकल घेवून घरी निघालो होतो.त्याचवेळी मला संदिप छगन मांडगे याने ए कुत्रया तु मोटारसायकल घेवून जावू नको खाली उतर असे म्हणून त्याने मला शिवीगाळ दमदाटी करून चापटाने मारहान केली त्यावेळी आमचे दोघामध्य शाब्दीक बाचाबाची होवून 7. नझटापट चालू असताना संदिप छगन मांडगे याने त्याचे कंबरेचा रिव्हालव्हर काढून मला व माझे सोबत असलेले माझे वरील नातेवाईक यांना किंवा इतर कोणीही नातेवाईक यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिव्हालव्हर मधून हवेत फायर केला. त्यानतंर संदिप छगन मांडगे हा निघून गेला.


सदर बाबत माहिती फोनवरून मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले.


सदरबाबत इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, रिव्हॉल्वर आणि बुलेट(गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत